|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home » वाणिज्य » अनन्याश्रीच्या खांद्यावर बिरला ग्रुपची मोठी जबाबदारी

अनन्याश्रीच्या खांद्यावर बिरला ग्रुपची मोठी जबाबदारी

नवी दिल्ली, (२ फेब्रुवारी ) – बिरला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्याश्री बिरला हिने आतापर्यंत आपल्या आवाजाची जादू पसरवली असून, आता लवकरच ती आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक घराण्यांमध्ये तरुण पिढीच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक असलेले कुमार मंगलम बिरला यांनीही त्यांच्या वारसांकडे जबाबदारी सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
कुमार मंगलम बिरला यांची मुलगी अनन्याश्री बिरला आणि मुलगा आर्यमन बिरला आता व्यवसायाची नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. कुमार मंगलम बिरला यांनी त्यांची दोन मुले अनन्या आणि आर्यमन विक्रम बिरला यांच्याकडे फॅशन आणि रिटेलची जबाबदारी सोपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. दोन्ही भावंडांचा आदित्य बिरला ग्रुपची कंपनी आदित्य बिरला फॅशन आणि रिटेल लिमिटेडच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला. दोघेही कंपनीच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम करतील.
अनन्याश्री बिर्ला यांच्या गाण्यांना प्रसिद्धी
कुमार मंगलम बिरला यांची मुलगी अनन्याश्री बिरला २८ वर्षांची आहे. व्यवसायाची जाण असण्यासोबतच गायिका म्हणूनही तिची ओळख आहे. अनन्याने इंग्रजी भाषेत गायलेल्या ५ सिंगल गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अनन्या बिरला यांना आधीपासूनच व्यवसायाची समज आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासून ती मायक्रो फायनान्स कंपनी चालवत आहे. ही कंपनी ग्रामीण भागातील महिलांना छोटे कर्ज देण्याचे काम करते. यासोबतच अनन्याला बिझनेस जगतात एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही ओळखले जाते. इतकंच नाही तर अनन्याश्री बिरला ’इकाई असाई’ या डिझाईन होम डेकोर ब्रँडच्या संस्थापक आहेत.

Posted by : | on : 2 Feb 2023
Filed under : वाणिज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g