Posted by वृत्तभारती
Wednesday, January 20th, 2016
मुंबई, [१९ जानेवारी] – व्हॉट्सऍपने या वर्षापासून वार्षिक सदस्यता शुल्क बंद करण्याचा निर्णय घेत ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत स्वरूपात ते उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी व्हॉट्सऍपसाठी १ डॉलर (६८ रुपये) वार्षिक शुल्क आकारण्यात येत असे. व्हॉट्सऍप वापरणार्या अधिकतर ग्राहकांकडे बहुतेकदा डेबिट वा क्रेडिट कार्ड नसते, ही बाब लक्षात घेऊन कंपनीने येत्या काही आठवड्यांतच व्हॉट्सऍपच्या सर्व आवृत्तींचे शुल्क हटविले जाणार असल्याची माहिती एका ब्लॉगवर पोस्टद्वारे दिली आहे. यापूर्वी व्हॉटस्ऍपच्या वापरकर्त्यांना वर्षभरानंतर ६८...
20 Jan 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 12th, 2016
नवी दिल्ली, [११ जानेवारी] – फ्लिपकार्ट या आघाडीच्या ऑनलाईन खरेदी-विक्री कंपनीने सीईओपदी बिनी बन्सल यांची नियुक्ती केली आहे. बन्सल यापूर्वी याच कंपनीचे सहसंस्थापक व चिफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम पहात होते. फ्लिपकार्टचे विद्यमान सीईओ सचिन बन्सल कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. बन्सल यांच्याकडे आता फ्लिपकार्टच्या आर्थिक, कायदेशीर, कॉर्पोरेट विकास व मानव संसाधन विभागांसह ई-कार्ट, कॉमर्स व मिंत्रासारख्या उपकंपन्यांचाही कारभार सोपवण्यात आला आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून सचिन बन्सल हे कंपनीच्या व्यवसायाची धोरणात्मक...
12 Jan 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 28th, 2015
=१ लिटरमध्ये १०० किमी मायलेज देणारी= पुणे, [२८ डिसेंबर] – टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्ताने (२८ डिसेंबर) टाटा कंपनी सामान्य जनतेसाठी टाटा मेगापिक्सल ही नवीन कार बाजारात आणत आहे. नॅनोच्या यशस्वी प्रकल्पानंतर येणारी ही नवीन कार १ लिटरमध्ये तब्बल १०० किलोमीटर धावणार आहे. रतन टाटा हे मोठ्या समूहाचे उद्योगपती असले तरी, मध्यमवर्गीयांना परवडेल अशी कार बनविण्याचे स्वप्न त्यांनी नेहमीच पाहिले होते. त्यांच्या आग्रहाखातरच ही आकर्षक भेट ग्राहकांना...
28 Dec 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 21st, 2015
=नव्या ग्राहकांसाठी खुशखबर, दोन महिने मिळणार सवलत= नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सार्वजनिक कंपनीने जास्तीत जास्त नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना सादर केली असून, यामध्ये मोबाईल कॉल दरात सुमारे ८० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या आहेत. त्यामुळे नव्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता यावा यासाठी मोबाईल कॉल दरात ८० टक्के कपात केली आहे, असे कंपनीचे अध्यक्ष...
21 Dec 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 5th, 2015
=ऍक्सिस बँकेचा पुढाकार= मुंबई, [३ डिसेंबर] – ऍक्सिस या देशातील तिसर्या क्रमांकाच्या खाजगी बँकेने एनआरआय खातेधारक प्रवासी भारतीय ग्राहकांसाठी डिस्प्ले असलेले डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. यामुळे आता आर्थिक व्यवहारांदरम्यान एसएमएसद्वारे वन टाईम पासवर्ड मिळवण्याची गरज राहणार नाही. या डिस्प्ले कार्डमध्ये ईएमव्ही चिप, डिस्प्ले स्क्रीन आणि टच सेन्सिटीव्ह बटन लावण्यात आले असून, यामुळे कार्डवरच ओटीपी जनरेट करता येईल. ग्राहकांचा युझर आयडी आणि पासवर्ड याचे कॉम्बिनेशन करून तयार झालेल्या या पासवर्डच्या...
5 Dec 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 5th, 2015
नवी दिल्ली, [४ डिसेंबर] – देशातील सराफा बाजारात गुरुवारी चार महिन्यांच्या नीचांकावर आलेले सोने आगामी काही दिवसांत आणखी स्वस्त होणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने याच महिन्यात व्याजदरात वाढ करण्याचे सुतोवाच केले असल्याने त्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून आला आहे. सध्या प्रति तोळा २५,३५० रुपये असा भाव असलेले सोने लवकरच २५ हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ही बातमी सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच आनंद...
5 Dec 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 23rd, 2015
नवी दिल्ली, [२१ जून] – २००५ पूर्वीच्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या चलनी नोटा परत करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली मुदत संपण्यासाठी आता शेवटचे १० दिवसच उरले आहेत. ज्यांच्यकडे या नोटा असतील, त्यांनी ३० जूनपर्यंत बँकांना परत कराव्यात, असे आवाहन आरबीआयतर्फे करण्यात आले आहे. २००५ पूर्वीच्या या नोटा चलनातून बाद करण्यात येणार असल्याने नागरिकांनी ठरावीक अवधीतच त्या परत करून सहकार्य करावे. लोक या नोटा आपले खाते असलेल्या बँकेत किंवा...
23 Jun 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, April 29th, 2015
=१९.६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती, दिलीप संघवी मागे पडले= मुंबई, [२८ एप्रिल] – रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत भारतीय होण्याचा मान प्राप्त केला आहे. त्यांची एकूण संपत्ती १९.६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. आतापर्यंत अव्वल स्थानी असलेले वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज उद्योगपती दिलीप संघवी यांनाही मुकेश अंबानी यांनी मागे टाकले आहे. जगभरातील धनाढ्य व्यक्तींची सातत्याने नोंद घेणार्या फोर्ब्जने जगभरातील श्रीमंत व्यक्तींची यादी...
29 Apr 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 27th, 2015
वॉशिंग्टन, [२६ फेब्रुवारी] – टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी क्षेत्रात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. दक्षिण कॅरोलिना येथे आयोजित ऑटोमोटिव्ह शिखर परिषदेत क्लेमसन विद्यापीठातर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. टाटा हे उद्योग क्षेत्रातील जागतिक पुढारी असून त्यांच्या प्रभावाला भारताच्या सीमांचे बंधन नाही. ते कोणतेही काम एकाग्रतेने आणि आत्मभान राखून करतात. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवायला हवा, असे मत विद्यापीठाचे अध्यक्ष जेम्स क्लेमेन्ट्स...
27 Feb 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 13th, 2015
भोपाळ, [१२ जानेवारी] – मार्च २०१५ पर्यंत देशभरात किमान ८० नव्या शाखा उघडण्याचे उद्दिष्ट देशातील पहिल्या भारतीय महिला बँकेने निर्धारित केले आहे. यात ग्रामीण भागातील २० विशेष शाखांचाही समावेश राहाणार आहे. महिला बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम् यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये येथील भारतीय महिला बँकेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. राज्याच्या माजी मुख्य सचिव निर्मला बच यांनी या शाखेचे उद्घाटन केले. बँकेने आधीच...
13 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 25th, 2014
=साध्या मोबाईलवरही सुरू होणार नेट बँकिंग= मुंबई, [२४ नोव्हेंबर] – सध्या नेट बँकिंगची सुविधा केवळ इंटरनेट असलेल्या महागड्या मोबाईलवरच उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, त्यांच्यासाठी आतापर्यंत ही सुविधा नव्हती. पण, आता नेट बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) इंटरनेट नसलेल्या अगदी साध्या मोबाईल फोनवरही नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामुळे साधा फोन वापरणार्यांनाही नेट बँकिंगची सेवा मिळणार आहे. देशभरातील दूरसंचार कंपन्यांनी...
25 Nov 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 24th, 2014
नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – सरकारी बँकांचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी येत्या दोन ते पाच डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये संपावर जाणार आहेत. याच महिन्याच्या १२ तारखेलाही बँक कर्मचारी संपावर गेले होते, हे याठिकाणी उल्लेखनीय. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँक कर्मचार्यांच्या संघटनेने या संपाचे आवाहन केले आहे. अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचे महासचिव सी.एच.व्यंकटचलम् यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच्या एक दिवसीय लाक्षणिक संपातून सरकारला जाग येईल, असे आम्हाला वाटले होते. मात्र,...
24 Nov 2014 / No Comment / Read More »