किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.14°से. - 30.61°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [११ जानेवारी] – फ्लिपकार्ट या आघाडीच्या ऑनलाईन खरेदी-विक्री कंपनीने सीईओपदी बिनी बन्सल यांची नियुक्ती केली आहे. बन्सल यापूर्वी याच कंपनीचे सहसंस्थापक व चिफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम पहात होते. फ्लिपकार्टचे विद्यमान सीईओ सचिन बन्सल कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.
बन्सल यांच्याकडे आता फ्लिपकार्टच्या आर्थिक, कायदेशीर, कॉर्पोरेट विकास व मानव संसाधन विभागांसह ई-कार्ट, कॉमर्स व मिंत्रासारख्या उपकंपन्यांचाही कारभार सोपवण्यात आला आहे. कार्यकारी अध्यक्ष म्हणून सचिन बन्सल हे कंपनीच्या व्यवसायाची धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी वरिष्ठ चमूला मार्गदर्शन करतील. तसेच कंपनीत नवनवी गुंतवणूक आणण्यावर त्यांचा भर असणार आहे. तर वाणिज्य व जाहिरात विभागाचे प्रमुख म्हणून मुकेश बन्सल कार्यरत आहे. तसेच ते मिंत्रा कंपनीचेही अध्यक्ष आहेत.
सध्या फ्लिपकार्टने ई-कॉमर्स बाजारपेठेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. पाच कोटींवर ग्राहक आणि ६० टक्के उत्पन्न एम-कॉमर्स म्हणजेच मोबाईलवरील खरेदी-विक्रीतून मिळत आहे. नव्या आकडेवारीनुसार, फ्लिपकार्टच्या वेबसाईटला दिवसाला एक कोटी ग्राहक भेट देतात.