किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=साध्या मोबाईलवरही सुरू होणार नेट बँकिंग=
मुंबई, [२४ नोव्हेंबर] – सध्या नेट बँकिंगची सुविधा केवळ इंटरनेट असलेल्या महागड्या मोबाईलवरच उपलब्ध आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट नाही, त्यांच्यासाठी आतापर्यंत ही सुविधा नव्हती. पण, आता नेट बँकिंगचा वाढता वापर लक्षात घेता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) इंटरनेट नसलेल्या अगदी साध्या मोबाईल फोनवरही नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामुळे साधा फोन वापरणार्यांनाही नेट बँकिंगची सेवा मिळणार आहे.
देशभरातील दूरसंचार कंपन्यांनी शुल्क आकारणीबाबत सहकार्य करावे, असा आदेश ट्रायने दिला असतानाही, काही दूरसंचार कंपन्या मात्र या प्रस्तावाचा विरोध करीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. याच अनुषंगाने ट्रायने आता ही सुविधा साध्या मोबाईलवरही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘युएसएसडी सिंपल टेक्स्ट मेसेज’ सिस्टिमच्या आधारे मोबाईल फोन सबस्क्रायबर्स फंड ट्रान्सफर, बँक खात्यातील शिल्लक रक्कम, बिल, पेमेंट, धनादेश रद्द करणे, चेकबुककरिता विनंती करणे आणि बँक खाते अद्ययावत करणे यासारख्या सुविधा सर्वसामान्यांना मिळणार आहेत. या व्यवस्थेच्या आधारे साध्या मोबाईलधारक ग्राहकांना केवळ *६७ ञ्च् या क्रमांकासोबत टेलिकॉम कंपनीकडून एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ग्राहक बँकेतील आपली माहिती जाणून घेऊ शकणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मोबाईल कंपन्यांच्या अधिकार्यांनी टेलिकॉम कंपन्यांकडून युएसएसडी कोड मिळविण्यासाठी ट्रायची मदत मागितली होती. प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चेनंतर टेलिकॉम कंपन्यांनी याला मान्यता दिली आहे