|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.64° C

कमाल तापमान : 29.54° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 73 %

वायू वेग : 6.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.54° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.21°C - 30.41°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.57°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.95°C - 32.13°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.1°C - 31.46°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.9°C - 31.53°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.05°C - 29.46°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट

रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट

Ratan Tataवॉशिंग्टन, [२६ फेब्रुवारी] – टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी क्षेत्रात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. दक्षिण कॅरोलिना येथे आयोजित ऑटोमोटिव्ह शिखर परिषदेत क्लेमसन विद्यापीठातर्फे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
टाटा हे उद्योग क्षेत्रातील जागतिक पुढारी असून त्यांच्या प्रभावाला भारताच्या सीमांचे बंधन नाही. ते कोणतेही काम एकाग्रतेने आणि आत्मभान राखून करतात. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवायला हवा, असे मत विद्यापीठाचे अध्यक्ष जेम्स क्लेमेन्ट्स यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केले आहे. केवळ ऑटोमोटिव्ह नव्हे तर पोलाद, वाहतूक, रसायने आणि संवाद यंत्रणा अशा सर्वच क्षेत्रात ७७ वर्षीय टाटा यांनी आपले कर्तृत्व गाजविले आहे. ते केवळ भारतातीलच नाही तर जागतिक स्तरावरील प्रभावी उद्योजक आहेत, असे मत विद्यापीठाच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आनंद ग्रामोपाध्ये यांनी व्यक्त केले आहे.
कॉर्नेल विद्यापीठातून वास्तूशिल्प विषयातील पदवी मिळविल्यानंतर टाटा यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनविषयक उच्चशिक्षण घेतले. रतन टाटा यांनी १९६२ मध्ये टाटा समुहात प्रवेश केला होता. त्यानंतर १९८१ साली त्यांनी टाटा समुहाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि उद्योगात बरेच धोरणात्मक बदल घडवून आणले. ते रोल्स रॉईस, मित्सुबिशी आणि जेपी मॉर्गनसारख्या अनेक नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापकीय मंडळावर आहेत.

Posted by : | on : 27 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g