किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, २ सप्टेंबर – रिलायन्सच्या तब्बल ६० लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी ६० लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणार्या रिलायन्स रिटेलने केला आहे.२४ ऑगस्टपासून जिओच्या संकेतस्थळावर फोनची नोंदणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी जवळपास ६० लाख ग्राहकांनी नोंदणी केल्याचा दावा रिलायन्स रिटेलने केला आहे. जिओ फोनची नवरात्रीपासून डिलेव्हरी केली जाणार असून प्रत्येक आठवड्याला ५० लाख फोनचे विक्री करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. प्री बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळे फोनचे उत्पादन आणि पुरवठ्याला कंपनीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. बहुचर्चित अशा रिलायन्स जिओ फोनसाठी सर्व लोक प्रतीक्षा करत आहे. मात्र देशभरातून लाखो लोकांनी केलेल्या बुकिंगमुळे जिओ फोन मिळवण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. जिओने सर्वात आधी भारतातील पाच शहरांमध्ये जिओ फीचर फोन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. कंपनीकडून दररोज १ लाख फोन वितरीत करण्यात येणार आहे.प्रमुख पाच शहरातील डिलिव्हरीनंतरच जिओ सेंटर आणि रिलायन्स जिओ स्टोअर्समध्ये हे फोन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. जिओफोनसाठी १५०० रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे. मात्र सुरुवातीला नोंदणी करताना ५०० रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित १००० रुपये मोबाइल मिळाल्यानंतर भरावे लागणार आहेत.जिओच्या संकेतस्थळावर आपली प्राथमिक माहिती भरून ‘प्री बुकिंग’ सुरू करता येणार आहे. संकेतस्थळावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर रिलायन्स जिओच्या जी फीचर फोनसाठी ‘रजिस्ट्रेशन’ होऊ शकणार आहे. ‘प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर फोनचे वाटप केले जाणार आहे. (वृत्तसंस्था)
Short URL : https://vrittabharati.in/?p=34858