|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.64° C

कमाल तापमान : 29.54° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 72 %

वायू वेग : 5.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.54° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 31.22°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.47°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.87°C - 32.93°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29°C - 32.52°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.78°C - 32.42°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.84°C - 30.17°C

sky is clear
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, ठळक बातम्या, राज्य » आंध्रच्या नव्या राजधानीचा आज शिलान्यास

आंध्रच्या नव्या राजधानीचा आज शिलान्यास

=पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार=
andhra-pradesh new capital Amaravathiअमरावती, [२१ ऑक्टोबर] – आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून गुंटूर जिल्ह्यातील अमरावतीची निवड करण्यात आल्यानंतर नव्या राजधानीचा शिलान्यास समारंभ उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आंध्रातील एन. चंद्राबाबू नायडू सरकारने यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृष्णा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या उदंडरायुनीपालम या गावात होणार्‍या या सोहळ्यात किमान चार ते पाच लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे, अशी माहिती राज्य सरकारचे सल्लागार पी. प्रभाकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे दीड तास उपस्थित राहणार आहेत. विजयवाडा येथून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या नव्या राजधानीचा शिलान्यास त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अमरावती शहर भूतकाळात कसे होते, सध्या कसे आहे आणि राजधानी म्हणून भविष्यात ते कसे विकसित होणार आहे, याचे सादरीकरण मोदी यांच्यापुढे करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने या समारंभासाठी काही केंद्रीय मंत्री राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील महत्त्वाचे राजकीय नेते, नामवंत व्यक्ती, उद्योगपती आणि विदेशी मान्यवरांनाही निमंत्रित केले आहे. यात सिंगापूर आणि जपानमधील मंत्री व निवडक शिष्टमंडळाचाही समावेश आहे.

Posted by : | on : 22 Oct 2015
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g