बँक कर्मचारी २ डिसेंबरपासून पुन्हा संपावर
Monday, November 24th, 2014नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – सरकारी बँकांचे कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी येत्या दोन ते पाच डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये संपावर जाणार आहेत. याच महिन्याच्या १२ तारखेलाही बँक कर्मचारी संपावर गेले होते, हे याठिकाणी उल्लेखनीय.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन या बँक कर्मचार्यांच्या संघटनेने या संपाचे आवाहन केले आहे. अखिल भारतीय कर्मचारी संघटनेचे महासचिव सी.एच.व्यंकटचलम् यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच्या एक दिवसीय लाक्षणिक संपातून सरकारला जाग येईल, असे आम्हाला वाटले होते. मात्र, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याने आता पाच दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.
युएफबीयुचा भाग असलेल्या एआयबीईए या संघटनेत नऊ बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी सदस्य आहेत. संघटनेने आखलेल्या कार्यक्रमानुसार, प्रत्येक क्षेत्रात संपाच्या आधी निदर्शनेही केली जाणार आहेत. दोन डिसेंबरला दक्षिण क्षेत्रात, ३ ला उत्तर आणि ४ व ५ डिसेंबरला अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात संप पुकारण्यात येईल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांच्या वेतनवृद्धीचा प्रश्न नोव्हेंबर २०१२ पासून प्रलंबित आहे. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात सध्या २७ बँका कार्यरत असून, त्यात ८ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. या बँकांच्या देशभरात पन्नास हजारांवर शाखा आहेत.
Short URL: https://vrittabharati.in/?p=18508

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!