Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यात ५८ टक्के पाऊस, ४९ टक्के पाणीसाठा

राज्यात ५८ टक्के पाऊस, ४९ टक्के पाणीसाठा

rain_on_the_fieldमुंबई, [१६ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसात राज्यात आकाश ढगाळ होते, तर बहुतांश ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. राज्यात आजपर्यंत ६०० मि.मी. पाऊस झाला असून तो १०३७ मि.मी. या सरासरीच्या ५८ टक्के आहे. राज्यातील सर्व जलप्रकल्पांत ४९ टक्के एवढा साठा आहे.
राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे- अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यात ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २२ जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ या ८ जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे.
राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी ङ्गक्त एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, ८८ तालुक्यात २६ ते ५० टक्के, १८० तालुक्यात ५१ ते ७५ टक्के आणि ८ तालुक्यात तर १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
धरणात ४९ टक्के पाणी साठा
राज्यातील सर्व जलप्रकल्पांत ४९ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के साठा होता. प्रकल्पातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षी याच दिवशीचा साठा पुढीलप्रमाणे-
मराठवाडा – ८ टक्के (४३), कोकण- ८७ टक्के (९३), नागपूर – ७५ टक्के (७९), अमरावती – ६२ टक्के (७४), नाशिक – ४४ टक्के (७७) आणि पुणे – ४९ टक्के (९१), इतर धरणे – ७१ टक्के (९७) असा पाणीसाठा आहे.
राज्यात १९९० टँकर्सद्वारा पाणी पुरवठा
राज्यातील १५१५ गावे आणि ३२२७ वाड्यांना आजमितीस १९९० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२ टँकर्सद्वारे पुरवठा करण्यात येत होता.
रोहयोच्या कामावरील मजुरांच्या संख्येत वाढ
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ५ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ५३० कामे सुरू असून या कामांवर एक लाख १२ हजार ७८४ मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात ४ लाख २२ हजार ९७ कामे शेल्ङ्गवर असून त्या कामांची मजूर क्षमता १२९५ लाख ६४ हजार एवढी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23843

Posted by on Sep 17 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1460 of 2451 articles)


निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका कॉंगे्रस, जदयु, राजद तोंडघशी नवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की ...

×