किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (२५ मार्च) – राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर अनेक दिवस शरद पवार यांच्या संपर्कात होते. महायुतीपासून दुरावून ते मविआत जातील, असा अंदाज होता. परंतु, महादेव जानकर यांनी अचानक आपण पहिलेपासूनच महायुतीचा घटकपक्ष आहोत आणि आपल्या पक्षाला लोकसभेची एक जागाही मिळणार असल्याची भूमिका माध्यमांसमोर मांडली.
माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जानकर यांची इच्छा होती आणि महाविकास आघाडी त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यास तयार होती. शरद पवार यांनी तशी तयारी दाखविली होती. याच अनुषंगाने महादेव जानकर आणि शरद पवार यांची भेट झाली होती. मात्र, या निमित्ताने होणार्या सर्व चर्चा आणि शक्यता मोडून काढत आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे जानकर यांनी रविवारी जाहीर केले. तसे संयुक्त निवेदनही त्यांनी प्रसिद्ध केले आहे. जानकर यांची ही भूमिका म्हणजे शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती जानकर यांनी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. महादेव जानकर यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा केली. जानकर यांनी महायुतीत राहणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यांना एक जागा देण्याचा निर्णय झाला आहे. महायुतीचे जागावाटप होईल, त्यावेळी त्यांना कुठला मतदारसंघ देण्यात आला, ते जाहीर केले जाईल. महादेव जानकर यांच्यामुळे महायुती अधिक बळकट होईल. ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे., त्याला ताकद मिळेल. असा विश्वास बैठकीत उपस्थित असलेले राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.