किमान तापमान : 31.01° C
कमाल तापमान : 32.33° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 74 %
वायू वेग : 4.52 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.33° C
29.12°C - 32.99°C
sky is clear29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast clouds-आसपासच्या सर्वच वस्तू केल्या गिळंकृत,
वॉशिंग्टन, (१३ मार्च) – अंतराळात सध्या एक अशी आकाशगंगा आहे, जी पूर्णपणे एकाकी पडली आहे. यासाठी ती स्वत:च कारणीभूत आहे. या आकाशगंगेने तिच्या सभोवताल जितक्या काही वस्तू होत्या, त्या सर्व गिळंकृत केल्या आहेत. ही घटना अलिकडील काळातली नाही तर, ९२० कोटी वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे, तेव्हा आपल्या ब्रह्मांडाच्या निर्मितीची सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या काळात तिच्या सभोवताल खूप सार्या वस्तू, तारे, ग्रह होते. मात्र, आता ती आकाशगंगा एकटीच आहे. या आकाशगंगेच्या एकटेपणाचे रहस्य उलगडण्यासाठी वैज्ञानिकांना अनेक वर्षे लागली. आपल्या सभोवतालच्या सर्वच वस्तूंना गिळंकृत करणार्या या आकाशगंगेचे नाव आहे ’३सी २९७’.
किमान शंभर आकाशगंगा केल्या गिळंकृत
या आकाशगंगेने तिच्या सभोवतालच्या वस्तूंसोबतच किमान १०० आकाशगंगा गिळंकृत केल्या असल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. इटली येथील टोरिनो विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ वैलेंशिया मिसाग्लिया यांच्या मते, आकाशगंगा सर्वसाधारणपणे समूहाच्या स्वरूपात असतात. या ३सी २९७ असे नाव असलेल्या आकाशगंगेच्या सभोवताल किमान डझनभर अन्य आकाशगंगा पहायला मिळतील, असा आमचा अंदाज होता, पण आम्हाला ती एकटीच दिसली. याचा तपास आम्ही चंद्रा एक्स-रे ऑब्जरव्हेटरीच्या माध्यमातून केला होता.
ही आकाशगंगा अतिशय शक्तिशाली आहे. तिच्यातून अतिशय वेगाने रेडिएशन बाहेर पडत आहे. तिच्यात एक महाकाय कृष्णविवराचेही अस्तित्व आहे, जो आता क्वासारच्या रूपात आहे. तिच्या मार्गात येणार्या प्रत्येक वस्तू या कृष्णविवरात सामावल्या जात आहेत. त्यामुळे या आकाशगंगेचा आकारही वाढत आहे. तिची भूक इतकी मोठी आहे की, आता तिच्या सभोवताल काहीच शिल्लक राहिलेले नाही. ती एकटीच दिसत आहे, असे मिसाग्लिया यांनी सांगितले.