किमान तापमान : 27.73° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 2.85 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.08°C - 29.39°C
sky is clear27.46°C - 29.3°C
sky is clear27.78°C - 29.59°C
sky is clear27.99°C - 29.44°C
broken clouds27.92°C - 30.53°C
light rain28.47°C - 30.42°C
light rainन्यूयॉर्क, (२७ मार्च) – आर्थिक संकटात सापडलेली अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेची अखेर विक्री झाली आहे. ही बँक फर्स्ट सिटिझन्स बँकने खरेदी केली. फर्स्ट सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनीने अमेरिकेतील प्रशासनाने जप्त केलेली सिलिकॉन व्हॅली बँक खरेदी करण्यास सहमती दर्शविल्यानंतर हा व्यवहार झाला आहे. दरम्यान, सोमवारी फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सिलिकॉन व्हॅली ब्रिज बँकेच्या सर्व ठेवी आणि कर्जे यांचा ताबा फर्स्ट-सिटिझन्स बँक आणि ट्रस्टला दिला. यामुळे सिलिकॉन व्हॅली ब्रिज बँक, नॅशनल असोसिएशनचे ठेवीदार आता आपोआप फर्स्ट-सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनीचे ठेवीदार बनले.
फर्स्ट-सिटिझन्स बँक आणि ट्रस्ट कंपनीने गृहीत धरलेल्या सर्व ठेवींचा विमा एफडीआयसीद्वारे काढलेल्या विमा मर्यादेपर्यंत कायम राहील, असे सरकारी कॉर्पोरेशनने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या शेअर कव्हरेजसह संपूर्ण बँक फर्स्ट सिटिझन्सने खरेदी केली गेली आहे. फर्स्ट सिटिझन्स बँकेकडे सुमारे १०९ अब्ज डॉलर्स मालमत्ता आणि ८९.४ अब्ज डॉलर्सच्या एकूण ठेवी आहेत. १० मार्च २०२३ पर्यंत सिलिकॉन व्हॅली बँकेची एकूण मालमत्ता अंदाजे १६७ अब्ज डॉलर्स असून, एकूण ठेवी सुमारे ११९ अब्ज डॉलर्सच्या आहेत. फर्स्ट सिटिझन्ससोबतच्या व्यवहारात सिलिकॉन व्हॅली बँकेची सुमारे ७२ अब्ज डॉलर्स मालमत्ता १६.५ अब्ज डॉलर्स सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी आर्थिक पडझड
अमेरिकेत व्यापाच्या बाबतीत १६वी सर्वांत मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळे ठोकण्याचा आदेश कॅलिफोर्नियातील डीएफपीआय (डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अॅण्ड इनोव्हेशन) या नियामक प्राधिकरणाकडून देण्यात आला होता. बँकेची मूळ कंपनी असलेल्या एसव्हीबी फायनान्शियल ग्रुपचे समभाग ९ मार्च रोजी जवळपास ६० टक्क्यांनी घसरल्यानंतर बँक बुडीत निघाली होती. अमेरिकेवर याआधीही २००८ मध्ये मोठे आर्थिक संकट ओढवले होते. त्यानंतर अमेरिकेच्या इतिहासातील आर्थिक पडझडीची ही सर्वांत मोठी घटना मानली जात आहे.