किमान तापमान : 27.87° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 83 %
वायू वेग : 2.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.93°C - 30.25°C
sky is clear28.41°C - 30.41°C
scattered clouds28.44°C - 30.73°C
broken clouds28.49°C - 31.26°C
sky is clear28.25°C - 30.8°C
light rain28.81°C - 31.42°C
sky is clearइस्लामाबाद, १ नोव्हेंबर – खासदार अयाझ सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेमागील सत्य सांगून पाकिस्तान सरकारला उघडे पाडले आहे. सरकारपुढील अडचणी वाढण्याच्या शक्यतांमुळे सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
अयाझ सादिक यांनी देशविरोधी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी सांगितले. शनिवारी गृहमंत्री इजाज शाह यांनीही सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार असल्याचे संकेत दिले. सादिक यांच्याविरोधात सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. संविधानाच्या कलम सहा अंतर्गत (देशद्रोहाशी संबंधित) खटला चालवण्याची मागणी याद्वारे करण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
लाहोरच्या रस्त्यांवर अभिनंदन, मोदींचे पोस्टर्स
लाहोर – पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) पक्षाचे खासदार अयाज सादिक यांनी पाकिस्तानी संसदेत भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेच्या वेळची पाकिस्तानी लष्करप्रमुखांची अवस्था जगजाहीर केल्याने मोठी खळबळ उडाली असतानाच आज अचानक लाहोरच्या रस्त्यांवर अभिनंदन वर्धमान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स दिसून आल्याने त्यात आणखी भर पडली आहे. विशेष म्हणजे या पोस्टर्समधून अयाज सादिक यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारताकडून पाकिस्तानवर हवाई हल्ले निश्चित होते, असा गौप्यस्फोट खा. अयाझ सादिक यांनी केला होता. यावरून पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर सादिक यांच्या मतदारसंघात अभिनंदन आणि पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले. यात सादिक यांना देशद्रोही ठरवत अभिनंदनच्या रूपातही दर्शवले आहे. काही पोस्टर्समध्ये भारताचे समर्थक असाही उल्लेख आहे.