|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.68° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.44 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.64°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.48°C - 29.63°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.57°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.89°C - 30.3°C

scattered clouds
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » अल्कोहोल कंपनी डियाजिओचे सीईओ इव्हान मिनेझिस यांचे निधन

अल्कोहोल कंपनी डियाजिओचे सीईओ इव्हान मिनेझिस यांचे निधन

लंडन, (८ जून) – जगातील सर्वात मोठी अल्कोहोल कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इव्हान मॅन्युएल मिनेझिस यांचे बुधवारी निधन झाले. लंडनच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६४ वर्षांचे होते आणि या महिन्याच्या अखेरीस (जून) निवृत्त होणार होते. माहितीनुसार, पोटात अल्सर झाल्याने त्यांना लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
इव्हान मिनेझिस यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील मॅन्युएल मिनेझिस हे भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते. मिनेझिस यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि आयआयएम अहमदाबाद येथे शिक्षण घेतले. त्यांचा भाऊ व्हिक्टर मिनेझिस हे सिटी बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीईओ आहेत. मिनेझिस १९९७ मध्ये डियाजिओमध्ये रुजू झाले. २०१२ मध्ये ते कंपनीचे कार्यकारी संचालक बनले आणि त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना कंपनीचे सीईओ बनवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीची कामगिरी खूप चांगली होती आणि डियाजिओ ही जगातील सर्वात मोठी स्पिरीट्स कंपनी बनली.
सध्या, कंपनीचे जगभरात २०० हून अधिक ब्रँड आहेत आणि कंपनीचा व्यवसाय १८० बाजारपेठांमध्ये पसरलेला आहे. जॉनी वॉकर व्हिस्की हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. स्कॉच व्हिस्की, व्होडका, जिन, रम, कॅनेडियन व्हिस्की, लिकर्स आणि टकीला यांमध्ये डियाजिओ हा अग्रगण्य ब्रँड आहे. मिनेझिस यांच्या प्रकृतीची स्थिती पाहता डिएजिओने सोमवारी हंगामी सीईओच्या नावाची घोषणा केली. मेनेझिस यांच्यावर वैद्यकीय उपचार होईपर्यंत डेब्रा क्रू कंपनीचे अंतरिम सीईओ राहतील. मिनेझिस यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर दोन दिवसांनी बुधवारी त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

Posted by : | on : 8 Jun 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g