|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.08° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.16°C - 31.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.87°C - 31.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

29.04°C - 30.28°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.88°C - 30.36°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.42°C - 30.44°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ४२ व्या क्रमांकावर

आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ४२ व्या क्रमांकावर

वॉशिंग्टन, (२५ फेब्रुवारी ) – अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ५५ आघाडीच्या जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये ४२ व्या क‘मांकावर आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणू पाहणार्या उदयोन्मुख बाजारपेठांचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम आहे. जसजसा भारताचा आकार व आर्थिक प्रभाव जागतिक स्तरावर वाढत आहे, तसतसे आयपी-चालित नवोपक‘माद्वारे त्यांची अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणार्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी भारत एक नेता होण्यास योग्य आहे, असे अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किलब‘ाईड म्हणाले.
अलिकडेच अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने आपल्या नवीनतम धोरणाचा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या अहवालात पेटंट आणि कॉपीराईट कायद्यांपासून ते बौद्धिक संपदा (आयपी) मालमत्तेची कमाई करण्याची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय करारांना मान्यता देण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. भारताने बनावट मालाच्या निर्मितीला आळा घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. भारताने केवळ संशोधनात्मक व प्रयोगात्मक विकास उत्पादन व बौद्धिक संपदा आधारित कराला प्रोत्साहन दिले नाही, तर बनावट उत्पादनापासून सावध राहण्याबाबत जागरूकता अभियानही राबविले व कठोर पावले उचलली आहेत. भारत लघु व मध्यम उद्योगासाठी (एसएमई) आयपी मालमत्तेची निर्मिती व वापर यासाठी जागतिस्तरावर नेता आहे, असेही त्यात म्हटले आहे.
भारताने कॉपीराईट उल्लंघन करणार्या सामग्रीच्या विरोधात अंमलबजावणी सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. बौद्धिक संपदेची (आयपी) अधिक चांगली समज व वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारताने उत्तम श्रेणीची मांडणी केली आहे. आयपीचे हे नवीन मॉडेल भारताच्या क्षमतेसाठी व सतत आर्थिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण असेल, असे त्यात म्हटले आहे.

Posted by : | on : 25 Feb 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g