किमान तापमान : 28.7° C
कमाल तापमान : 28.89° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.01 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.89° C
28.42°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds– संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा,
– पूर्वीचे विक्रम मोडणार,
न्यू यॉर्क, (१९ मे) – येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०२७ या काळात कमाल उष्णता वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. या पाच वर्षांत एक असे वर्ष असेल जे २०१६ च्या तापमानाचा विक्रम मोडणारे ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या तापमानाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे.
२०१६ मध्ये वार्षिक तापमान १.२८ डिग्री सेल्सियसने वाढले होते, जे औद्योगिक काळापेक्षा (१८५०-१९०० या कालावधीतील सरासरी) अधिक होते. २०१५ ते २०२२ या कालावधीतील सर्वाधिक आठ उष्ण वर्षांची नोंद करण्यात आली आहे. आता हवामान बदलाच्या वेगामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये विक्रमी उष्णता वाढण्याची शक्यता ९८ टक्के आहे.
तापमान वाढण्याचे कारण
हरितगृह वायू आणि अल निनोमुळे वाढत्या तापमानाचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानी दिला आहे. हवामान बदलाच्या वेगामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये जागतिक तापमान १८५०-१९०० च्या सरासरीपेक्षा १.१५ अंश सेल्सियस जास्त होते. याशिवाय एप्रिलमधील तीव‘ उष्णतेसाठी हवामानातील बदलांना सर्वाधिक जबाबदार धरले जाऊ शकते.
तापमान तात्पुरते वाढेल
याचा अर्थ असा नाही की, जग कायमचे पॅरिस बेंचमार्क ओलांडेल. एजन्सीचे प्रमुख, पीटीरी तालास म्हणाले की, संयुक्त राष्ट्रसंघानुसार, आपण तात्पुरत्या आधारावर १.५ अंश सेल्सियस पातळी ओलांडू शकतो. तापमान या पातळीनंतर कमी होऊ शकते. येत्या काही महिन्यांत अल निनो विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्णताही वाढणार आहे.