|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.19° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.87°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.59°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.5°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 30.36°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.7°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.12°C - 30.09°C

overcast clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इस्रायलचे उत्तर गाझापट्टीत तासभर हल्ले

इस्रायलचे उत्तर गाझापट्टीत तासभर हल्ले

राफाह, (२६ ऑक्टोबर) – इस्रायली लष्कराच्या पथकांनी आणि रणगाड्यांनी गुरुवारी उत्तर गाझापट्टीत जवळपास तासभर हल्ले केले. दहशतवाद्यांच्या काही ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले. दोन आठवडे केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर मोठ्या प्रमाणात जमिनीवरील कारवाई गाझात केली जाणार असून, त्याच्या तयारीसाठी हा हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्याने दिली. गाझामधील इंधन संपुष्टात येत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिल्यानंतर इस्रायलने ही कारवाई केली आणि गाझापट्टीतील मदतकार्यात कपात करण्यास इस्रायलने भाग पाडले आहे. या महिन्याच्या सुुरुवातीला युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने गाझापट्टीला वेढा घातला आहे. अनेक दशकांपासून चाललेल्या इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात गाझामधील वाढत्या मृत्यूंची सं‘या अभूतपूर्व आहे.
२००७ पासून गाझावर हुकूमत गाजवणार्या आणि इस्रायलसोबतच्या मागील चार युद्धांपासून वाचलेल्या हमासला चिरडून टाकण्याच्या उद्देशाने इस्रायलने अपेक्षित जमिनीवरील आक‘मण सुरू केल्यास, गाझापट्टीत आणखी मोठी जीवितहानी होऊ शकते. हमास सासित गाझामधील आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, मागील चोवीस तासांत ७५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, रात्रभर झालेल्या हल्ल्यादरम्यान सैन्याने दहशतवाद्यांचा खात्मा करीत त्यांचे पायाभूत सुविधांचे केंद्र उडवले तसेच रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा अड्डाही उद्ध्वस्त केला, अशी माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली. इस्रायलने मागील चोवीस तासांत गाझावर २५० पेक्षा जास्त हवाई हल्ले केले आहेत.
पुढील मोठ्या कारवाईची तयारी
पुढील मोठ्या कारवाईची तयारी करण्यासाठी जमिनीवरून मर्यादित स्वरूपाचा हल्ला करण्यात आला, अशी माहिती इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते रीअर अ‍ॅडमिरल डॅनियल हागारी यांनी दिली. इस्रायलने मागील २० दिवसांत गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करून हमासच्या केंद्रांना लक्ष्य केले. इतकेच नव्हे तर, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे हजारो ठिकाणेही उद्ध्वस्त केले आहेत. मागील २० दिवसांच्या हल्ल्यांमध्ये हमासच्या २० कमांडर्सचा खात्मा करण्यात आला तसेच त्यांचे ४६ मोठे दहशतवादी ठार झाले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

Posted by : | on : 26 Oct 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g