|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.68° C

कमाल तापमान : 28.89° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 3.44 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.89° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 30.23°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.64°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.48°C - 29.63°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.57°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.89°C - 30.3°C

scattered clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इस्रायलने लेबनॉनचे तीन तळ केले नष्ट

इस्रायलने लेबनॉनचे तीन तळ केले नष्ट

– इस्रायलचे जबरदस्त प्रतिहल्ले,
– हवाई दलाच्या विमानांची जोरदार बॉम्बफेक,
तेल अवीव, (२३ ऑक्टोबर) – गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाची व्याप्ती वाढतच आहे. लेबनॉनची बंदी घालण्यात आलेली संघटना हिजबुल्ला इस्रायली प्रतिष्ठानांना सातत्याने लक्ष्य करीत आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायली सैन्याने केलेल्या जबरदस्त प्रतिहल्ल्यात रविवारी हिजबुल्लाचे तीन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. इस्रायली हवाई दलाच्या विमानांनी रविवारी जोरदार बॉम्बफेक करून व दुसरीकडे लष्कराने क्षेपणास्त्रे टाकून या परिसराला भाजून काढले.
इस्रायली सैन्याने उत्तर गाझामध्ये पत्रके टाकली आणि तेथील रहिवाशांना हा परिसर रिकामा करण्याचा अंतिम इशारा दिला. उत्तर गाझामधील नागरिकांनी हा परिसर रिकामा केला नाही तर, त्यांचाही हमास या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे मानले जाईल आणि त्यांनाही हल्ल्यात ठार मारले जाईल, असा इशारा इस्त्रायली लष्कराने तेथील नागरिकांना दिला.
इस्रायल अशी प्रत्युत्तराची कारवाई करेल की, ज्यामुळे लेबनॉनचा नाश होईल, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले. हमास बरोबर युद्धात हातमिळवणी करणे ही हिजबुल्लाची सर्वांत मोठी चूक असेल, असेही ते म्हणाले. माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्रायली डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) पत्रके टाकून पॅलेस्टिनींना उत्तर गाझामधून दक्षिणेकडे जाण्याचा अंतिम इशारा दिला आहे. इस्रायली लष्कराचा हा संदेश मोबाईल फोनच्या ऑडिओ संदेशाद्वारे गाझा पट्टीतील लोकांनाही प्रसारित करण्यात येत आहे. आम्ही सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत नाही. परंतु, नागरी जीवितहानी कमी करण्यासाठी गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागातील रहिवाशांना दक्षिणेकडे जाण्यास सांगत आहोत, असे इस्रायली सेनादलाने स्पष्ट केले.

Posted by : | on : 23 Oct 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g