किमान तापमान : 28.04° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 0.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
27.73°C - 30.24°C
sky is clear27.7°C - 30.01°C
sky is clear27.58°C - 29.99°C
sky is clear27.91°C - 30.39°C
sky is clear28.02°C - 30.38°C
scattered clouds28.04°C - 30.47°C
sky is clear– एचएसबीसीने घेतला ताबा,
लंडन, (१३ मार्च) – कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात् एसव्हीबी कोसळल्यानंतर गोंधळ निर्माण झाला असतानाच, या बँकेची यूकेतील शाखा केवळ एका पाऊंडमध्ये अधिग्रहित करण्यात आली, अशी माहिती एचएसबीसी सोमवारी दिली. एचएसबीसी यूके बँक पीएलसीने सिलिकॉन व्हॅली बँक यूके लि.चे अधिग्रहण एक पाऊंडमध्ये केले, अशी घोषणा एचएसबीसी होल्डिंग्ज करीत असल्याचे या बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१० मार्चपर्यंत सिलिकॉन व्हॅली बँकेने ५.५ अब्ज पाऊंडचे कर्ज दिले होते तर, या बँकेत ६.७ अब्ज पाऊंडच्या ठेवी होत्या. ३१ डिसेंबर २०२२ रजी संपलेल्या आर्थिक वर्षात सिलिकॉन व्हॅली बँकेचा करपूर्व नफा ८.८० कोटी पाऊंडचा होता. सिलिकॉन व्हॅली बँकेचे मूर्त समभाग १४ लाख पाऊंडचे असतील, अशी अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ठेवीदारांना पैसे देणे सुरू
देशातील बँकिंग प्रणालीतील नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी सिलिकॉन व्हॅली बँकेच्या ठेवीदारांचे पैसे सोमवारपासून परत करणे सुरू करणार असल्याची घोषणा बायडेन प्रशासनाने केली आहे.
करदात्यांच्या पैशांना धोका नाही : ज्यो बायडेन
सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्याने करदात्यांच्या पैशांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी नागरिक आणि व्यावसायिकांना आश्वस्त केले आहे.