किमान तापमान : 29.59° C
कमाल तापमान : 31.19° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 7.06 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.19° C
27.43°C - 31.99°C
sky is clear27.71°C - 30°C
sky is clear27.4°C - 29.73°C
sky is clear27.69°C - 30.09°C
sky is clear28.16°C - 29.86°C
broken clouds26.69°C - 30.54°C
light rainकाबुल, (२८ मार्च) – अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. काबूलमधील परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेल्या भीषण स्फोटात दोन ठार तर बारा जण जखमी झाले. स्फोट इतका जोरदार होता की आकाशात धुराचे ढग पसरले आणि स्फोटाचा आवाज दूरवर दणाणला.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाजवळ सोमवारी दुपारी अचानक स्फोट झाला. ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाणही काबूलचे मुख्य व्यापारी केंद्र आहे. स्फोटामुळे मोठी आग लागली आणि आगीच्या ज्वाळांसोबत धुराचे लोटही दिसत होते. ज्वाला दूरवर दिसत होत्या आणि आकाशात धुराचे ढग दाटून आले होते. स्फोट इतका जोरदार होता की, स्फोटाचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला. बिझनेस सेंटर आणि परराष्ट्र मंत्रालयाभोवती चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
परराष्ट्र मंत्रालयाजवळील बिझनेस सेंटरच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाल्याचे समजते. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये कारमधून ज्वाला उठताना दिसत आहेत. त्याच्या आजूबाजूच्या अनेक गाड्यांचेही नुकसान झाले. एका लहान मुलासह १२ जखमींना काबूलमधील आपत्कालीन रुग्णालयात नेण्यात आले आहे. याशिवाय दोन जणांचे मृतदेहही आणण्यात आले आहेत. घटनास्थळी बचाव कर्मचारी सक्रिय आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थाही बचाव कार्यात गुंतल्या आहेत. आता आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे.