|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 32.33° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 71 %

वायू वेग : 4.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.33° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

29.33°C - 31.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.86°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.78°C - 30.34°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.76°C - 30.2°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.45°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी; अमेरिकेत बँकिंगचे मोठे संकट

गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी; अमेरिकेत बँकिंगचे मोठे संकट

वॉशिंग्टन, (१३ मार्च) – अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील संकट अधिक गडद होताना दिसत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर आता न्यूयॉर्कच्या सिग्नेचर बँकेसाठी वाईट बातमी आहे. रविवारी अमेरिकेच्या नियामकाने सिग्नेचर बँक बंद केली. यूएस बँकिंग इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी शोकांतिका आहे. ३ दिवसांच्या आत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे वक्तव्य २ बँकांच्या दुर्दशेवर आले आहे. न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंटच्या वित्तीय सेवांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सिग्नेचर बँक आपल्या नियंत्रणाखाली घेतली आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत बँकेची मालमत्ता ११०.३६ अब्ज आणि ठेवी ८८.५९ अब्ज आहेत.
दोन बँकांच्या अपयशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यास जबाबदार असणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा नियामकांनी सिग्नेचर बँक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गेल्या २४ तासांत सिलिकॉन व्हॅली बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी दोन मोठ्या बातम्या आल्या आहेत. पहिली बातमी अशी होती की सरकार अडचणीत असलेल्या बँकेला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. मात्र, बँकेच्या ठेवीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १३ मार्चपासून म्हणजेच आजपासून ठेवीदाराचे त्याच्या पैशांवर पूर्ण नियंत्रण असेल.

Posted by : | on : 13 Mar 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g