किमान तापमान : 31.08° C
कमाल तापमान : 33.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 3.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.99° C
29.12°C - 33.99°C
few clouds29.16°C - 31.86°C
sky is clear28.87°C - 31.44°C
sky is clear29.04°C - 30.28°C
scattered clouds28.88°C - 30.36°C
overcast clouds28.42°C - 30.44°C
overcast cloudsवॉशिंग्टन, (१७ फेब्रुवारी ) – अमेरिकेच्या आकाशात चीनचा ’स्पायर बलून’ दिसल्यापासून अमेरिकेने आता चीनबाबतच्या धोरणात आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिका असे निर्णय मोठ्या प्रमाणात घेत आहे, ज्यामुळे चीनला राग येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेच्या संसदेत (सिनेट) एक विधेयक आणण्यात आले आहे, ज्यामुळे चीनला धक्का बसू शकतो. जर हे विधेयक अमेरिकन संसदेत मंजूर झाले तर ते भारतासाठी खूप फायदेशीर ठरेल. खरे तर, अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकन खासदारांनी अमेरिकन संसदेत विधेयक आणले आहे.
ते पुढे म्हणाले की, चीनच्या प्रक्षोभक कृतींचा मी निषेध करतो, ज्यामध्ये चीनने लष्करी शक्तीच्या आधारे एलएसी ची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या या ठरावामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध संरक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होईल. भारत आणि चीनमध्ये ३,५०० किलोमीटर लांबीची सीमा आहे. अरुणाचल आणि सिक्कीम असलेल्या भागाला पूर्व भाग म्हणतात, तर उत्तराखंड आणि हिमाचल असलेल्या भागाला मध्य भाग म्हणतात. दुसरीकडे, लडाख क्षेत्राशी संबंधित सीमा पश्चिम भागाचा भाग मानल्या जातात. मात्र या लांबलचक सीमेवर असे अनेक क्षेत्र आहेत जिथे चीन आणि भारत यांच्यात प्रचंड वाद आहे. या वादाने अनेक प्रसंगी हिंसक रूपही घेतले आहे. लडाखबाबत हा वाद कायम आहे, अरुणाचल प्रदेशबाबत चीनचे दावेही मोठे आहेत. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट मानतो. त्याच्या दृष्टीने संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे. या कारणास्तव, भारताचा कोणताही नेता जेव्हा अरुणाचल प्रदेशला भेट देतो किंवा तेथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले जाते तेव्हा चीन प्रथम प्रतिक्रिया देतो आणि त्याला आपल्या सार्वभौमत्वाशी जोडतो.
ओरेगॉनचे सिनेटर जेफ मर्क्ले यांनी एजन्सीला सांगितले की, ते अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य भाग मानतात. त्यामुळे त्यांनी अमेरिकन संसदेत याबाबत विधेयक आणले आहे. या विधेयकावर सिनेटर मर्क्ले यांना सिनेटर बिल हेगर्टी यांचे समर्थन आहे. सिनेट हेगेर्टी म्हणाले की, चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्राला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी अमेरिका आपल्या सामरिक भागीदारांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. यामध्ये भारताचे नाव विशेषतः समाविष्ट आहे. ते पुढे म्हणाले की, हे विधेयक आणण्यामागे अमेरिकेने अधिकृतपणे अरुणाचल प्रदेशला भारताचा अविभाज्य भाग मानण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनच्या वाढत्या आक्रमकतेचाही त्यांनी निषेध केला.