|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.48° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 3.23 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.87°C - 32.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.75°C - 31.72°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.66°C - 30.73°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.91°C - 30.41°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.61°C - 30.41°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.82°C - 30.38°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » जगात अजूनही दुटप्पीपणा

जगात अजूनही दुटप्पीपणा

-जयशंकर यांनी ‘ग्लोबल नॉर्थ’ला धुतले,
न्यू यॉर्क, (२४ सप्टेंबर) – जगात आजही दुटप्पीपणा आहे. प्रभावशाली पदांवर ताबा असलेले देश होणार्या बदलांचा विरोध करीत आहेत आणि ऐतिहासिक प्रभुत्व असलेले लोक त्यांच्या क्षमतांचा शस्त्रांप्रमाणे वापर करीत आहेत, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दुटप्पीपणा करणार्या ग्लोबल नॉर्थला अक्षरशः धुतले.
राजकीय बदलासाठी राजकीय इच्छाशक्तीपेक्षा जास्त राजकीय दबाव आहे. ग्लोबल साऊथ याचे प्रतीक आहे. राजकीय विरोधही आहेच. प्रभावशाली पदांवर असलेले बदलासाठी वाढत असलेल्या दबावाला विरोध करीत असल्याचे आपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाहत आहोत, असे जयशंकर यांनी भारत आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनद्वारे आयोजित ‘साऊथ रायजिंग : पार्टनरशिप्स, इन्स्टिट्यूशन्स अ‍ॅण्ड आयडियाज’ या विषयावर आयोजित मंत्रिस्तरीय सत्राला संबोधित करताना सांगितले.
या कार्यक‘माला संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिरा कंबोज, रिलायन्स फाऊंडेशनचे मु‘य कार्यकारी अधिकारी जगन्नाथकुमार, भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील निवासी समन्वयक शोम्बी शार्प आणि ओआरएफचे अध्यक्ष समीर सरन यांनीही संबोधित केले.
काय आहे ‘ग्लोबल नॉथ’?
ग्लोबल नॉर्थमध्ये उत्तर अमेरिका आणि युरोपातील समृद्ध देशांचा समावेश आहे. याच्यात ओशिनिया तसेच इतर ठिकाणच्या काही देशांचा समावेश आहे. साधारणपणे ग्लोबल नॉर्थच्या धनाढ्य देशांच्या तुलनेत ग्लोबल साऊथमध्ये पराकोटीची गरिबी, उत्पन्नातील असमानता आणि जीवन अत्यंत आव्हानात्मक आहे. भारताला जगभरात ‘ग्लोबल साऊथ’चा नेता समजले जाते.

Posted by : | on : 25 Sep 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g