किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 29.5° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 77 %
वायू वेग : 3.08 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.5° C
27.43°C - 29.99°C
sky is clear27.67°C - 29.99°C
sky is clear27.27°C - 29.73°C
sky is clear27.79°C - 30.06°C
scattered clouds28.08°C - 30.17°C
broken clouds28.12°C - 30.54°C
light rainपापुआ न्यू गिनी, (२६ फेब्रुवारी ) – अफगाणिस्तानमधील फैजाबाद आणि जपाननंतर पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. १२ तासांपेक्षा कमी कालावधीत तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने जगभरातील भूवैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सुनामीचा धोका वाढला आहे. रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम न्यू ब्रिटन प्रदेशात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले. त्सुनामीसारखा इशारा अद्याप देण्यात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तत्पूर्वी शनिवारी रात्री १०.२७ मिनिटांनी जपानच्या होक्काइडो शहरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएसजीसीच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या शहरात भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती.
२० फेब्रुवारीला जपानमध्येही भूकंप झाला होता. त्यावेळी त्याची तीव्रता ५.५ होती. मात्र, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यानंतर अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या मते, रविवारी पहाटे २.१५ च्या सुमारास ४.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानातील फैजाबादपासून ईशान्येला २७३ किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. एएफपीनुसार, रविवारी सकाळी पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम न्यू ब्रिटन प्रदेशात ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने असे आश्वासन दिले आहे की त्सुनामीच्या भीतीमुळे लोकांच्या प्रतिसादात त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. युएसजीएस ने म्हटले आहे की भूकंपाची खोली ३८ किलोमीटर (२३ मैल) होती आणि रविवारी सकाळी विरळ लोकवस्ती असलेल्या पश्चिम न्यू ब्रिटन द्वीपसमूह प्रदेशात त्याची नोंद झाली.