|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:52 | सूर्यास्त : 18:55
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.29° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 5.66 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 28 May

29.01°C - 30.99°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 29 May

28.37°C - 30.48°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 30 May

28.56°C - 30.05°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 31 May

28.5°C - 30.83°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 01 Jun

29.41°C - 30.81°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 02 Jun

29.45°C - 30.85°C

light rain
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » जयशंकर, ब्लिंकन यांच्यात चर्चा

जयशंकर, ब्लिंकन यांच्यात चर्चा

वॉशिंग्टन, (२९ सप्टेंबर) – भारत-कॅनडा राजनैतिक वादाच्या पृष्ठभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली व जागतिक घडामोडींवर चर्चा केली. या चर्चेत भारत व अमेरिकेने संरक्षण, अंतराळ व स्वच्छ ऊर्जा यासार‘या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या निरंतर महत्त्वावर भर दिला आहे. खलिस्तानी फुटिरतावाद्यांच्या हत्येवरून भारत व कॅनडा यांच्यात राजनैतिक वाद सुरू आहे.
जयशंकर सध्या वॉशिंग्टन डीसीच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौर्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या जी-२० शिखर परिषदेनंतर परराष्ट्र विभागातील गुरुवारची बैठक ही दोन्ही देशांदरम्यानची सर्वोच्च स्तरीय चर्चा होती. आज माझे मित्र अँटनी ब्लिंकन यांना स्टेट डिपार्टमेंटमध्ये भेटून आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जून महिन्यातील भेटीचा पाठपुरावा करून जयशंकर यांनी ब्लिंकन यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच जागतिक घडामोडींवरसुद्धा विचारविनिमय केला. लवकरच आमच्या २+२ बैठकीची पायाभरणी होईल, असे जयशंकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारत-अमेरिका २+२ मंत्रिस्तरीय संवादाच्या पाचव्या आवृत्तीचे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांनी बैठकीच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी नोव्हेंबरच्या पूर्वार्धात मंत्रिस्तरीय संवाद होणार असल्याचे कळते. संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासह ब्लिंकन हे अमेरिकन शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, तर जयशंकर व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

Posted by : | on : 29 Sep 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g