|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.1° C

कमाल तापमान : 33.03° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 67 %

वायू वेग : 4.75 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.03° C

Weather Forecast for
Monday, 20 May

28.87°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.75°C - 31.72°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.66°C - 30.73°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.91°C - 30.41°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.61°C - 30.41°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.82°C - 30.38°C

overcast clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » जयशंकर यांनी सांगितला सांस्कृतिक संतुलनाचा अर्थ

जयशंकर यांनी सांगितला सांस्कृतिक संतुलनाचा अर्थ

– संयुक्त राष्ट्रसंघात घणाघात,
न्यू यॉर्क, (२४ सप्टेंबर) – जे लोक आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली आहेत, ते आपल्या उत्पादन क्षमतांचा फायदा घेत आहेत. ज्यांच्याकडे संस्थागत किंवा ऐतिहासिक प्रभाव आहे, ते प्रत्यक्षात या क्षमतांचा वापर शस्त्राप्रमाणे करीत आहेत. ते सगळे खरे बोलतील. मात्र, जगात अजूनही दुटप्पीपणा असल्याची वास्तविकता आहे. कोरोना महामारी याचे उदाहरण आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आयोजित कार्यक‘मात सांगितले.
या संपूर्ण बदलामुळे ग्लोबल साऊथकडून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर अधिक दबाव येईल, असे मला वाटते. ग्लोबल नॉर्थमध्ये केवळ नॉर्थ नाही. असे काही भाग आहेत, जे स्वतःला उत्तरेचे समजत नाहीत, पण बदलाला यांचा मोठा विरोध आहे. जगातील वैविध्य ओळखणे, त्याचा सन्मान करणे आणि इतर संस्कती व परंपरांना सन्मान देणे म्हणजे सांस्कृतिक संतुलन आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. त्यांनी जी-२० परिषदेचा उल्लेख करताना बाजरीचे उदाहरण दिले व ग्लोबल साऊथमध्ये गहू कमी आणि बाजरी जास्त वापरली जात असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्याच्या नावाप्रमाणेच बाजाराच्या नावाखालीही बर्याच गोष्टी केल्या जातात. इतरांचा वारसा, परंपरा, संगीत, साहित्य आणि जीवन जगण्याच्या पद्धतींचा सन्मान करणे हा बदलांचा भाग असून, तो ग्लोबल साऊथला पाहायचा आहे, असे जयशंकर म्हणाले. या कार्यक‘मात पॅनल चर्चेत सहभागी होणार्यांत पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जोआओ गोम्स क्रविन्हो यांचाही समावेश होता. डिसेंबर २०२३ मध्ये ब्राझीलने अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी भारताच्या जी-२० अध्यक्षपदासाठी काही महिने शिल्लक आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सुधारणांबाबत काही प्रगती होईल. कर्ज, शाश्वत विकास ध्येय संसाधने, हवामान कृती संसाधने, डिजिटल प्रवेश, पोषण आणि लिंगसमानता या संपूर्ण जगाला त्रस्त करणार्या प्रमुख समस्या आहेत. कोरोना आणि युक्रेवर अंशतः लक्ष केंद्रित केल्यामुळे हे विषय जागतिक चर्चांच्या बाहेर झाले आहेत. जगाला ज्याबद्दल बोलायचे आहे, त्याबद्दल जी-२० ला प्रत्यक्षात आणणे ही एक जी-२० मधील खरी समस्या होती, असे जयशंकर यांनी सांगितले.
जयशंकर यांचे विश्लेषण योग्यच : समीर सरन
युरोपची समस्या म्हणज जगाची समस्या असते. मात्र. जगाची समस्या ही युरोपची नसते, अशी खोचक टीका ओआरएफचे अध्यक्ष समीर सरन यांनी केली आणि जयशंकर यांची युरोपबाबत अतिशय कठोर भूमिका असते असे काही लोकांना वाटते. परंतु, जयशंकर यांचे अतिशय योग्य विश्लेषण असल्याचे सरन यांनी सांगितले.

Posted by : | on : 25 Sep 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g