किमान तापमान : 29.41° C
कमाल तापमान : 30.46° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.46° C
27.93°C - 30.99°C
few clouds28.36°C - 30.11°C
overcast clouds28.39°C - 30.96°C
broken clouds28.63°C - 31.3°C
broken clouds28.69°C - 30.77°C
few clouds28.65°C - 31.44°C
sky is clear२४ ठार, ८०० जखमी,
अंकारा, ३१ ऑक्टोबर – तुर्कीमधील ईझमिर शहरात शुक्रवारी आलेल्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक इमारती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून, ढिगार्यात शेकडो लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ग्रीसमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तुर्कीचे आरोग्य मंत्री फर्हेटीन कोका यांच्यानुसार, भूकंपात जखमी झालेल्या ४३५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, २५ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तसेच, ९ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर ३६४ जणांना सुटी देण्यात आली. भूकंपानंतर ईझमिरमध्ये मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. ईझमिरचे राज्यपाल यवुज सलीम कोझर यांनी सांगितले की, भूकंपामुळे किनारपट्टीवरील सेफेरिसार जिल्ह्यात त्सुनामीची लाट आल्याने एकजण जखमी झाला. तटरक्षक दलाचे ११६ कर्मचारी, ११ बोटी, तीन हेलिकॉप्टर्सद्वारे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तुर्की रेड क्रिसेंटने ११२ कर्मचारी, १३७ स्वयंसेवक, २७ वाहने आणि पाच मोबाईल फिल्ड किचनच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रीस आणि तुर्की देशाच्या सीमा भागात शुक्रवारी स्थानिक वेळ दुपारी ३.०० वाजता रिश्टर स्केलवर ७.० इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. यानंतर जवळपास २४४ हादरे जाणवले असून, त्याची तीव्रताही एका लहान भूकंपाएवढी म्हणजे ४.० इतकी असल्याची माहिती तुर्कीच्या आपत्कालीन विभागाने दिली.
भूकंपाचे कें द्र ग्रीसमधील कार्लोव्हॅसिऑन शहराच्या उत्तर-पूर्व भागात१४ किमी दूर अंतरावर एजियन समुद्रात १६.५ किमी खोलीवर होते. जमिनीपासून कमी खोलवर भागात कें द्र असल्यामुळे तीव्र हादरे बसले. त्यामुळेच अधिक इमारतींचे नुकसान झाल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने म्हटले आहे.