|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.62° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.51 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Thursday, 09 May

28.05°C - 29.91°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.34°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.64°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.98°C - 30.01°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

27.85°C - 30.95°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.27°C - 30.89°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ’त्याच्या’ बॅगमध्ये सापडली ८०० वर्ष जुनी ममी!

’त्याच्या’ बॅगमध्ये सापडली ८०० वर्ष जुनी ममी!

अथेन्स, (१ मार्च) – पेरुव्हियन पोलिसांनी मंगळवारी २६ वर्षीय ज्युलिओ सीझर बर्मेजोला ताब्यात घेतले. ज्युलिओ एका फूड डिलिव्हरी कंपनीत काम करतो. पोलिसांनी त्याच्या बॅगेतून सुमारे ६०० ते ८०० वर्षे जुना ममी (मानवी सांगाडा) जप्त केला. ममी त्याच पिशवीत होती ज्युलिओ लोकांच्या घरी अन्न पोहोचवत असे. पेरूमध्ये २६ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयच्या बॅगमधून ८०० वर्षे जुनी ममी सापडली आहे. मम्मी जुनी असल्याचे पाहून पोलिसांनी चौकशी केली असता फूड डिलिव्हरी बॉयने धक्कादायक बाब सांगितली. तो म्हणाला की ती माझी आध्यात्मिक मैत्रीण आहे. सध्या पोलिसांनी ममी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या चौकशीत त्याने आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्याच्या वडिलांनी ३० वर्षांपूर्वी कोणाकडून तरी ही ममी विकत घेऊन घरी आणल्याचा दावा केला होता. फूड डिलिव्हरी बॉयने त्याचे नाव ’जुआनिटा’ ठेवले. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युलिओ असे म्हणताना दिसत आहे की, जुआनिता (मम्मी) माझ्या खोलीत माझ्यासोबत घरी राहते. ती माझ्यासोबत झोपते आणि मी तिची काळजी घेतो. ती माझी आध्यात्मिक प्रेयसी आहे. तो त्याच्या मित्रांना दाखवणार होता. या मुद्द्यावर पेरूच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे वक्तव्य आले आहे. मंत्रालयाने सांगितले की प्री-हिस्पॅनिक अवशेष ’ममीफाईड प्रौढ पुरुष’ होते. जो बहुधा पुनोच्या पूर्वेकडील प्रदेशातील असावा. हे ठिकाण लिमाच्या आग्नेयेस सुमारे १,३०० किलोमीटर (८०० मैलांपेक्षा जास्त) आहे.मंत्रालयातील एका तज्ज्ञाने सांगितले, ’ही मामी जुआनिता नसून ती जुआन आहे. हा सांगाडा असलेल्या व्यक्तीचे वय किमान ४५ वर्षे होते. ते पट्टीने गुंडाळलेले होते. सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले की, ’ममी केलेले अवशेष संरक्षण आणि संवर्धनाच्या उद्देशाने ताब्यात घेण्यात आले आहेत.

Posted by : | on : 1 Mar 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g