|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.82° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 1.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.48°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.59°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.5°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 30.36°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.7°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.12°C - 30.09°C

overcast clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद सलीमची कराचीत हत्या

दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद सलीमची कराचीत हत्या

– पोलिसांना नदीत सापडला मृतदेह,
कराची, (२६ ऑक्टोबर) – पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या अज्ञात लोकांकडून हत्येचे सत्र कायम आहे. अलिकडेच मसूद अझहरचा निकटवर्तीय दाऊद मलिकच्या हत्येनंतर आता पळपुटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद सलीमची येथे हत्या करण्यात आली. तो येथील दिल्ली कॉलनीत राहायचा. हत्येनंतर त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. मागील आठवड्यात ल्यारी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांना नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील काही दिवसांत पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार शाहीद लतिफ, आयएसआयचा एजंट मुल्ला बाहौर उर्फ होर्मुझ आणि मागील आठवड्यात दाऊद मलिकची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. मलिक जैशव्यतिरिक्त लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जांगवी या संघटनांसोबतही जुळलेला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत मसूद अझहर, हाफीज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिमला दहशतवादी घोषित केले आहे.
दाऊद मलिकला उत्तरी वजीरिस्तानमध्ये ठार करण्यात आले. अज्ञात लोकांनी त्याला गोळ्या घातल्या होत्या. पाकिस्तानमध्ये कित्येक मोस्ट वॉण्टेड अतिरेक्यांना या वर्षी ठार करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केवळ पाकिस्तानातीलच नव्हे, तर जगातील इतर ठिकाणीही त्यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे.

Posted by : | on : 26 Oct 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g