किमान तापमान : 30.24° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 5.09 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
28.44°C - 31.99°C
sky is clear28.05°C - 30.62°C
sky is clear27.88°C - 30.32°C
sky is clear27.59°C - 29.85°C
sky is clear27.84°C - 30.49°C
few clouds28.29°C - 30.35°C
few clouds-आयएमएफ, वर्ल्ड बँक, आशियाई विकास बँकेने फिरविली पाठ,
इस्लामाबाद, (१४ एप्रिल) – पाकिस्तान आजच्या घडीला जगात सर्वाधिक दिवाळखोर देश बनला असून, देशातील महागाईमुळे जीवितहानी होत असतानाही एक-दोन देश वगळता त्यांना कुणीही मदत करण्यास पुढे आलेले नाही. अशातच आता आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने या कंगाल देशाकडे पाठ फिरविली आहे. याशिवाय जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि आशियाई विकास बँकेने विकासदराचा अंदाज जाहीर करून कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे दर्शविले आहे.
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनुसार, पाकिस्तानात सध्या महागाई दर ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, त्यावर नियंत्रण मिळविण्याइतपत कोणताही उपाय शाहबाज सरकारच्या हाती राहिला नसल्याचे दिसून येते. देशातील जनता पिठापासून दुधाच्या थेंबापर्यंत आणि घरातील वीज पुरवठ्यापासून स्वयंपाकाच्या गॅस उपलब्ध होण्यासाठी लाचार झाली आहे. ही स्थिती इतकी भयानक झाली आहे की, अनेकजण मोफत पीठ हस्तगत करण्यासाठी लूट करत असल्याचे चित्र जवळपास देशभर पाहावयास मिळत आहे. यात काही लोकांना जीव सुद्धा गमवावा लागत आहे.
कर्ज आणि कर्ज
पाकिस्तानने आतापर्यंत अनेक देशांकडून अब्जावधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. हा आकडा ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा अधिक म्हणजेच देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के इतका आहे. धक्कादायक असे की ६० ट्रिलियन इतक्या कर्जांमध्ये ३५ टक्के (३० अब्ज डॉलर्स) वाटा एकट्या चीनचा आहे. हा आकडा फेब‘ुवारी २०२२ मध्ये २५.१ अब्ज डॉलर्स इतका होता.
नाकर्तेपणावर बोट
पाकिस्तानने मागील अनेक वर्षांत सातत्याने दहशतवाला प्रोत्साहन देण्यावर अब्जावधी रुपये खर्च केल्याचे जगजाहीर आहे. त्यापेक्षा कित्येक पटीने दहशतवादाचे संकट सोसत अनेक देशांना नुकसान सोसावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात ०.५ टक्क्यांपर्यंत मोठी घट केली आहे. या अगोदर आयएमएफने विकासदराच्या अंदाजाला ३.५ टक्क्यांवरून२ टक्क्यांवर आणले होते. दुसरीकडे जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेने सुद्धा आयएमएफसारखे मत व्यक्त केले आहे. केवळ पुढील वर्षातच पाकिस्तानला काहीसा दिलासा मिळू शकतो. आगामी आर्थिक वर्षात विकास दर ३.५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल, असेही या सर्वोच्च संस्थांनी स्पष्ट केले आहे.