|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.58° C

कमाल तापमान : 28.85° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 4.25 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.85° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

28.74°C - 30.17°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.43°C - 30.34°C

moderate rain
Weather Forecast for
Monday, 13 May

28.18°C - 30.02°C

moderate rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.7°C - 30.59°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.89°C - 30.17°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.71°C - 30.58°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

एका महिन्यातील तिसरी घटना,
इस्लामाबाद, २ नोव्हेंबर – पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदूंचा छळ करण्याच्या घटना वाढत असतानाच, कराची येथे आज सोमवारी प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली.
या मंदिरातील देवतेचा पुतळा आणि प्रतिमेचीही विटंबना करण्यात आली. आज सकाळी काही भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना हा प्रकार दिसून आला. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच, शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि निषेध करू लागले. यापूर्वी १० आणि २४ ऑक्टोबर रोजी सिंध प्रांतात अशाच घटना घडल्या होत्या.
मंदिरात तोडफोड करून, हिंदूंच्या भावना दुखावणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, या घटनेचा मानवी हक्क आयोगानेही निषेध केला आहे. तर, आरोपींना शक्य तितक्या लवकर अटक करण्यात येईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.
बांगलादेशात पेटवली हिंदूंची घरे
ढाका – काही लोकांनी इस्लामचा अपमान करणार्‍या फेसबुक पोस्ट टाकल्याच्या अफवेमुळे संतप्त झालेल्या जमावाने बांगलादेशच्या कुमिला येथील हिंदूंच्या घरांना आगी लावल्या.
पॅरिसमधील एका शिक्षकाची, मोहम्मद पैगंबरांवरील वादग्रस्त व्यंग्यचित्र दाखविल्याने हत्या करण्यात आल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी उचललेल्या पावलांचे फ्रान्समध्ये राहणार्‍या एका बांगलादेशी व्यक्तीने फेसबुक पोस्टवर कौतुक केले होते. शिक्षकाच्या हत्येचाही त्याने निषेध केला होता. त्याच्या याच पोस्टमुळे हा हिंसाचार घडला. रविवारी रात्री लोकांचा जमाव कुमिला येथील हिंदू वस्तीवर धावून गेला आणि घरांना आगी लावत, लोकांना मारहाणही केली. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना अटक केली आहे.
ज्या व्यक्तीच्या पोस्टमुळे हा हिंसाचार झाला, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या जाळपोळीच्या घटनेत सहभागी असणार्‍या इतरांनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.

Posted by : | on : 3 Nov 2020
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g