|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 26.99° C

कमाल तापमान : 27.12° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

26.99° C

Weather Forecast for
Thursday, 02 May

26.99°C - 30.45°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.3°C - 30.34°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.48°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28°C - 30.56°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 06 May

28°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.36°C - 29.66°C

few clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तानी संसद १३ ऑगस्टला विसर्जित होणार

पाकिस्तानी संसद १३ ऑगस्टला विसर्जित होणार

– पुढील निवडणूक नवाज शरीफ लढवण्याची शक्यता,
इस्लामाबाद, (०८ जुलै) – पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली अर्थात् संसद १३ ऑगस्टला विसर्जित केली जाणार आहे. पाकिस्तानचे विधि मंत्री आझम नजीर तरार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान नवाज शरीफदेखील निवडणूक लढवू शकणार आहेत. नवीन निवडणूक कायद्यानंतर पीएमएल-एन सुप्रीमोवरील बंदी उठवण्यात आली आहे. आता ते आणि पाकिस्तान शुगर माफिया जहांगीर खान निवडणूक लढवण्यास पात्र आहेत.
पाकिस्तानच्या एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, पाकी संसदेचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. यानंतर काळजीवाहू व्यवस्था केली जाईल, जेणेकरून निवडणुका होईपर्यंत संसदेचे कामकाज चालू ठेवता येईल. मात्र, देशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता नॅशनल असेंब्लीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच बरखास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऐरी न्यूजच्या वृत्तानुसार, विधि मंत्री म्हणाले की, पाकिस्तानच्या नवीन कायद्यानुसार आता कोणालाही आजीवन अपात्र ठरविले जाणार नाही. त्याचा कमाल कालावधी फक्त ५ वर्षे असेल. पाकिस्तानमध्ये संसदेशिवाय कोणीही कायदा बदलू शकत नाही, असे सांगून तरार म्हणाले की, पाकिस्तानमधील आघाडी सरकार आपल्यासोबतच्या घटक पक्षांसोबत सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही.

Posted by : | on : 8 Jul 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g