|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.51° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.08 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Thursday, 09 May

27.43°C - 29.96°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.67°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.27°C - 29.73°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.79°C - 30.06°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.08°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 14 May

28.12°C - 30.54°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पाकिस्तान : ईशनिंदेचा आरोपी असलमला अटक

पाकिस्तान : ईशनिंदेचा आरोपी असलमला अटक

– हनुमानाचा केला होता अपमान,
इस्लामाबाद, (२४ मार्च) – शेजारील इस्लामिक देश पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पोलिसांनी हनुमानाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली पत्रकार असलमला बुधवारी अटक केली. असलमच्या या अटकेची पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ईशनिंदा कायद्याखाली असलम बलोचला झालेली अटक ही आश्चर्याची बाब बनली आहे. कारण या कलमांतर्गत आतापर्यंत केवळ अल्पसंख्यकांविरुद्ध विशेषत: हिंदूंवरच कारवाई केल्याचे दिसून आले आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधच्या मीरपूर खास तहसीलमधील लुहाना पंचायतीचे हे प्रकरण आहे. हिंदू नेते रमेश कुमार यांनी १९ मार्च रोजी असलम बलोच नावाच्या व्यक्तीच्या फेसबुक पोस्टविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या पोस्टमध्ये असलमने हनुमानाचे चित्र जोडले होते आणि त्याखाली अपमानजनक मजकूर लिहिला होता. केवळ हिंदू समाजालाच नाही तर सिंधी मुस्लिमांनाही ही पोस्ट मुळीच पटली नसल्याचे रमेश यांनी सांगितले. बलोचने हे छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅपवरही सामायिक केले. अखेर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या या पोस्टविरोधात रमेश यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
रमेश कुमार यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिस अधिकार्यांनी असलम बलोचविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई केली आणि पाकिस्तान दंड संहितेच्या कलम १५३ सह कलम २९५ लागू करण्यात आले. दोन पंथांमध्ये शत्रुत्व पसरवण्याच्या कारवायांसाठी हे कलम २९५ ए नोंदविण्यात येते. सिंधचे अल्पसंख्यक विभाग मंत्री ग्यानचंद इसरानी यांनीही याप्रकरणी पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली. सिंधचे पोलिस महासंचालक आणि मीरपूरच्या पोलिस अधीक्षकांनी पत्रकार असलमच्या अटकेचे आदेश जारी केले. सिंधमध्ये कोणालाही दुसर्याच्या धर्माचा अपमान करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 25 Mar 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g