|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.7° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.01 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.28°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.79°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.79°C - 30.02°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.76°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28°C - 29.92°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.82°C

broken clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » पुरवठा साखळी लवचिकता वाढविणे महत्वाचे : गोयल

पुरवठा साखळी लवचिकता वाढविणे महत्वाचे : गोयल

– केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल ओसाका येथे जी ७ व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन,
ओसाका, (२८ ऑक्टोबर) – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आज जपानमधील ओसाका येथे जी ७ व्यापार मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. गोयल यांनी पुरवठा साखळी लवचिकता वाढविण्याचा मुद्दा मांडला आणि या संबंधी अनेक सूचना केल्या. कोविड १९ साथरोग आणि भू-राजकीय घटनांमुळे विद्यमान पुरवठा साखळीतील असुरक्षा समोर आली आहे, परिणामी वस्तूंच्या किमती आणि जागतिक महागाई वाढली आहे असे त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी, महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि पुरवठा साखळीत नवोन्मेष आणि डिजिटलीकरणाची गरज या बाबींना त्यांनी प्रोत्साहन दिले. पुरवठा साखळीत वैविध्य आणि कर्मचार्‍यांचे कौशल्य वाढवण्याची गरज, गोयल यांनी अधोरेखित केली. त्यांनी सरकारांना पुरवठा साखळी सुलभ करण्यासाठी आणि सीमेपलिकडे व्यापार सुलभ करण्यासाठी नियामक आराखड्यावर सहकार्य करण्याचे आवाहन केले. जी २० च्या नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद केलेल्या जीव्हीसीच्या मॅपिंगसाठी जेनेरिक आराखडा तयार करण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.
या सत्रात सरकार, खाजगी क्षेत्र आणि ओईसीडी, जागतिक व्यापार संघटना अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते. लवचिक पुरवठा साखळी विकसित करण्याबाबत बहुतांश खाजगी क्षेत्रांनी आपले सकारात्मक अनुभव सामायिक केले. सुझुकीने भारतातील त्यांच्या अनुभवाबाबत सादरीकरण केले. आपण भारतात एक विश्वासार्ह विक्रेता म्हणून कसा जम बसवला आणि भारतातील पुरवठा साखळींमध्ये ९५% पेक्षा जास्त स्वदेशीकरण कसे साध्य केले याचा उल्लेख, सुझुकीने केला. ईआरआयएने, त्यांनी केलेल्या अभ्यासाचाही उल्लेख केला ज्यामध्ये जागतिक मूल्य साखळीत भारताची वाढलेली टक्केवारी दिसून आली.
गोयल यांनी अनेक मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केली. गोयल यांनी जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री निशिमुरा यासुतोशी, ब्रिटनच्या उद्योग आणि व्यापार राज्य सचिव केमी बडेनोक, ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री डॉन फॅरेल, अमेरिका व्यापार प्रतिनिधी आणि राजदूत कॅथरीन ताई, जर्मनीच्या आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्रालयाच्या सचिव उदो फिलिप यांची भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करणे, शुल्क संबंधी अन्य अडथळे दूर करणे, विद्यमान परकीय व्यापार कराराच्या वाटाघाटींची सद्यस्थिती आणि जागतिक व्यापार संघटनेसंबंधी आगामी मंत्रिस्तरीय परिषद यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. गोयल यांनी डब्ल्यूटीओच्या महासंचालक एनगोझी आणि मित्सुई, जपान आणि जपान-भारत व्यापार सहकार्य समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागावा यांचीही भेट घेतली.

Posted by : | on : 29 Oct 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g