किमान तापमान : 31.07° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 5.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
29.12°C - 32.99°C
few clouds29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast cloudsब्राझिलिया, (२४ फेब्रुवारी ) – सलग दोन पूल गेम हरल्याच्या रागाने दोघांनी लोकांना एका रांगेत उभे केले आणि एका १२ वर्षांच्या मुलीसह सात जणांना गोळ्या घालून ठार केले. ब्राझीलमधील मातो ग्रोसो राज्यातील सिनोप शहरात ही घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये दोन व्यक्तींनी लोकांना एका रांगेत उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सिनोप सिटीमध्ये पूल गेममध्ये पराभूत झाले. एकापाठोपाठ एक सलग दोन गेम गमावल्यानंतर तेथे उपस्थित लोक हसून त्याची खिल्ली उडवू लागले. यामुळे दोघेही संतप्त झाले आणि त्यांनी लोकांना रांगेत उभे करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
एक व्यक्ती लोकांना रांगेत उभे करत आहे तर दुसरी व्यक्ती पिक-अप व्हॅनमधून शस्त्रे बाहेर काढत असल्याचे व्हिडिओ फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. जिथे काही काळ लोक हसत-हसत पूल गेमचा आनंद लुटत होते. दरम्यान गोळ्यांचा कडकडाट सर्व काही शांत करतो. व्हिडिओ फुटेजनुसार, पांढरा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीला प्रथम पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घातल्या. त्यानंतर दुसरा माणूसही त्याच्या हँडगनने लोकांवर गोळीबार करू लागतो. या गोळीबारात काही जणांचा जीव वाचण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी हत्याकांडानंतर दोन्ही बंदूकधारी पूल टेबलवर ठेवलेली रोकड आणि महिलांची पर्स घेऊन फरार झाले.