|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.82° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.94°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.59°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.5°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 30.36°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.7°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.12°C - 30.09°C

overcast clouds
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » बोरिस जॉन्सन यांचा संसद सदस्यत्वाचा राजीनामा

बोरिस जॉन्सन यांचा संसद सदस्यत्वाचा राजीनामा

-पार्टीगेट घोटाळा चौकशी अहवालानंतर निर्णय,
लंडन, (१० जून) – पार्टीगेट घोटाळ्याच्या संसदीय समितीच्या चौकशी अहवालानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदीय समितीने आपल्या तपासात, पंतप्रधानपदावर असताना कोरोना काळात टाळेबंदी नियमांचे उल्लंघन करून संसदेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
५८ वर्षीय जॉन्सन यांनी टाळेबंदी नियमांचे उल्लंघन करून कोरोनाच्या काळात डाऊनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी करण्याबद्दल हाऊस ऑफ कॉमन्सची (ब्रिटिश संसद) दिशाभूल केल्याच्या आरोपांची संसदीय समिती चौकशी करीत होती. विशेषाधिकार समितीकडून या प्रकरणावर गोपनीय पत्र मिळाल्यानंतर जॉन्सन यांनी शुक‘वारी राजीनामा दिला. जॉन्सन यांनी संसदीय समितीवर त्यांची संसदेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. एका निवेदनात ते म्हणाले की, समितीने आतापर्यंत मी जाणूनबुजून किंवा बेजबाबदारपणे संसदेची दिशाभूल केल्याचा एकही पुरावा सादर केलेला नाही.
यापूर्वी शुक‘वारी, माजी पंतप्रधान जॉन्सन यांनी चौकशी अहवाल प्राप्त झाल्याची माहिती दिली होती आणि दावा केला होता की, तो सदोष आणि पूर्वग‘हदूषित आहे. यावर्षी मार्चमध्ये विशेषाधिकार समितीला दिलेल्या निवेदनात जॉन्सन यांनी संसदेची दिशाभूल केल्याचे मान्य केले होते. मात्र, त्यांनी हे जाणूनबुजून केल्याचा इन्कार केला. कोविड टाळेबंदी दरम्यान डाऊनिंग स्ट्रीटमध्ये आयोजित पार्ट्यांमध्ये टाळेबंदी नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा योग्य नाही. ते अत्यावश्यक कार्यक‘म होते. त्यामुळे त्याला परवानगी देण्यात आली. कार्यक‘मादरम्यान सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 11 Jun 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g