|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.19° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.09°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.59°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.5°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 30.36°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.7°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.12°C - 30.09°C

overcast clouds
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » ब्रिटनमध्ये ७० वर्षांनंतर रंगणार राज्याभिषेक सोहळा

ब्रिटनमध्ये ७० वर्षांनंतर रंगणार राज्याभिषेक सोहळा

– चार्ल्स तिसरे ६ मे रोजी राजसत्ता हाती घेणार,
लंडन, (१२ एप्रिल) – ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक पुढील महिन्यात होणार आहे. यानिमित्त होणार्या शाही सोहळ्याची माहिती राजघराण्याकडून जाहीर करण्यात आली. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग, गाड्यांचा ताफा, राज्यभिषेकावेळचा पोशाख आदींची माहिती ट्विटरवर एका खास इमोजीसह जाहीर करण्यात आली आहे.
राजे चार्ल्स यांच्या मातोश्री आणि ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राणीपदाचा अभिषेक जून १९५३ मध्ये झाला होता. त्यानंतर ७० वर्षांनी ब्रिटनच्या राजघराण्यात राज्याभिषेक होणार आहे. सहा मे रोजी चार्ल्स (वय ७४) हे ब्रिटनचे राजे म्हणून अधिकृतपणे पदग्रहण करणार आहेत. बकिंगहॅम पॅलेसने राज्याभिषेकाची संपूर्ण माहिती काल जाहीर केली. वेस्टमिनिस्टर बे येथे पत्नी कॅमेला यांच्यासह नवे राजे चार्ल्स यांच्या शिरावर राजघराण्याचा मुकुट चढविला जाईल. त्यावेळी धार्मिक विधीही होतील.
राजघराण्याच्या परंपरेनुसार राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी राजे चार्ल्स तृतीय आणि कॅमेला हे डायमंड ज्युबिली स्टेट कोच (सहा घोड्यांची विशेष) बग्गीतून शाही मिरवणुकीसह बकिंगहॅम पॅलेसपासून वेस्टमिनिस्टर बे ला पोहचतील. ही बंदिस्त बग्गी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कारकिर्दीच्या ६० व्या वर्षपूर्तीनिमित्त २०१२ मध्ये तयार केली आहे. या बग्गीतून केवळ राजघराण्यातील प्रमुख व्यक्तीच जाऊ शकतात. कधी कधी संबंधित राजा किंवा राणीचा जोडीदार असतो. राजघराण्याच्या पाहुण्यांसाठी बग्गीचा वापर केला जातो. या नव्या शाही डायमंड ज्युबिली स्टेट कोचची निर्मिती ऑस्ट्रेलियात झाली आहे. हिचे रूप परंपरागत असले तरी ती आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. बग्गीत वातानुकूलन यंत्रणा, स्वयंचलित खिडक्या आहेत. बग्ग्यांसाठी साधारणपणे लाकडाचा वापर केला जातो, पण डायमंड ज्युबिली अ‍ॅल्युमिनिअमपासून तयार केली आहे.
हायड्रॉलिक सस्पेशनमुळे यातून प्रवास करणे अत्यंत आरामदायी असते, असे रॉयल कलेक्शन ट्रस्टचे प्रमुख सॅली गुडसर यांनी सांगितले. डायमंड ज्युबिली स्टेट कोचच्या शीर्षावरील सोन्याचा मुकुट ओक वृक्षातून कोरलेला आहे. एचएमएस व्हिक्टरीच्या जगातील सर्वांत जुन्या नौदलातील नौकेच्या ओक लाकडातून कोरलेला होता.

Posted by : | on : 12 Apr 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g