|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.81° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.86 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.7°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.15°C - 31.01°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 29.72°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.26°C - 29.68°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.93°C - 29.43°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.98°C - 29.15°C

sky is clear
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारताची दहशतवादाविरोधात उत्कृष्ट कामगिरी

भारताची दहशतवादाविरोधात उत्कृष्ट कामगिरी

वॉशिंग्टन, (२८ फेब्रुवारी ) – भारत सरकारने दहशतवादाविरोधात मोठे काम केले आहे. अमेरिकन सरकारच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दहशतवादी संघटनांची ओळख पटवणे, त्यांचा नायनाट करणे आणि दहशतवादाचा धोका कमी करण्यात भारताने मोठे काम केले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या ब्युरो ऑफ काउंटर टेररिझमच्या ’कंट्री रिपोर्ट्स ऑन टेररिझम २०२१: इंडिया’ या अहवालानुसार, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश, उत्तर पूर्व राज्ये, मध्य भारतातील काही भाग भारतातील दहशतवादाने प्रभावित आहेत. दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर लोककल्याणाच्या कामात कसे गुंतले आहे, याचाही या अहवालात उल्लेख आहे. यामध्ये शाळा चालवणे, वैद्यकीय शिबिरे उभारणे आणि तरुणांना प्रशिक्षण देण्यासह रोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरून तरुणांना कट्टरपंथी होण्यापासून रोखता येईल.
अहवालानुसार, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, आयएसआयएस, अल कायदा, जमात उल मुजाहिदीन, जमात उल मुजाहिदीन बांगलादेश यांसारख्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, २०२१ मध्ये दहशतवादी संघटनांनी त्यांच्या रणनीतीत थोडा बदल केल्याचे दिसून आले आणि आता ते सामान्य नागरिकांना लक्ष्य करून ड्रोन आणि आयईडी इत्यादी स्फोट घडवत आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की, २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १५३ दहशतवादी हल्ले झाले, ज्यामध्ये ४५ सुरक्षा दलाचे जवान, ३६ नागरिक आणि १९३ दहशतवादी अशा एकूण २७४ लोकांचा मृत्यू झाला. अहवालानुसार, २०२१मध्ये भारतातील दहशतवाद प्रभावित क्षेत्रात फारसा बदल झालेला नाही. भारताने राज्य आणि केंद्र पातळीवर गुप्तचर यंत्रणा मजबूत केल्या आहेत. भारताने बंदरांच्या सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर बायोग्राफिक आणि बायोमेट्रिक स्क्रीनिंगची व्यवस्था केल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. विमानतळांवर दुहेरी तपासणी करण्याच्या उद्देशाने क्ष-किरण तपासणी करण्यात आली आहे. भारताची तपास संस्था एनआयएने लष्कर-ए-तैयबा, हरकत उल जिहादी इस्लामी या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या आरोपाखाली शिक्षा दिली आहे. एनआयएने सप्टेंबर २०२१ मध्ये आयएसआयएसशी संबंधित ३७ प्रकरणांचा तपास केला आणि १६८ लोकांना अटक केली.

Posted by : | on : 28 Feb 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g