|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 32.07° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.07° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » भारतीयांना‘जॉब व्हिसा‘ मिळवणे होणार सोपे

भारतीयांना‘जॉब व्हिसा‘ मिळवणे होणार सोपे

– अमेरिकेत कायदा बदलण्यासाठी विधेयक सादर,
वॉशिग्टन, (११ मार्च) – भारतीयांना अमेरिकेतील जॉब व्हिसा मिळणे सोपे होण्याची शक्यता आहे. सध्या व्हिसा कायद्यात बदल करण्यासाठी अमेरिकन संसदेत नवीन कायदा विधेयक सादर करण्यात आले आहे. अमेरिकेतील सध्याच्या फेडरल इमिग्रेशन कायद्यानुसार दरवर्षी व्यवसाय किंवा नोकरीसाठी व्हिसा मंजूर केला जातो. त्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी शुक्रवारी प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते राजा कृष्णमूर्ती आणि जीओपीचे लॅरी बुशॉन यांनी द्विपक्षीय विधेयक सादर केले.
राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, आपल्या देशात ‘हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टिम’ आहे. यामुळे जगभरातील उत्कृष्ट आणि कुशल कर्मचारी वर्गाला येथे येण्यास मदत होते. सध्याचा कायद्यानुसार, कर्मचार्यांच्या मूळ देशाच्या आधारावर रोजगार-आधारित व्हिसा देण्याची संख्या मर्यादित आहे. म्हणजे, अमेरिकन नोकरीसाठीचा व्हिसा मिळणार्यांची संख्या प्रत्येक देशानुसार वेगवेगळी आहे. यानुसार, काही देशांना जास्त तर, काहींना कमी व्हिसाची परवानगी दिली जाते. नवीन कायद्याचा उद्देश अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकट करणे हा आहे, यामुळे नोकरीच्या अधिक संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते.
जगभरातील कुशल कामगारांना आकर्षित करण्यासाठी व्हिसाचा वापर सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे या विधेयकात नमूद आहे. असे करण्यासाठी ‘हाय स्किल्ड इमिग्रेशन सिस्टिम’मधील विविध देशांनुसार त्यांच्या व्हिसाच्या संख्येत असलेली तफावत म्हणजे भेदभाव दूर करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर, भारतीयांना याचा मोठा फायदा होईल. कारण, दरवर्षी भारतातून लाखो लोक अमेरिकेत नोकरी करण्याच्या व्हिसासाठी अर्ज करतात.

Posted by : | on : 11 Mar 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g