|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.91° C

कमाल तापमान : 35.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 36 %

वायू वेग : 10.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

35.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.15°C - 35.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29°C - 31.59°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.46°C - 30.95°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.84°C - 29.99°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.69°C - 29.24°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.43°C - 29.24°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » मला कारागृहातून बाहेर काढा

मला कारागृहातून बाहेर काढा

-इम्रानखान यांची वकिलांकडे गयावया,
इस्लामाबाद, (०९ ऑगस्ट) – मी संपूर्ण आयुष्य कारागृहात राहायला तयार आहे,असे वक्तव्य एक दिवस आधी करणारे माजी पंतप्रधान इम्रानखान यांनी आज मात्र, ‘मला कारागृहात राहायचे नाही, कसेही करून बाहेर काढा,’ अशी गयावया आपल्या वकिलांकडे केली.तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरल्यानंतर तीन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आलेले इम्रान सध्या पंजाब प्रांतातील अ‍ॅटॉक कारागृहात बंद आहेत. मागील शनिवारी अटक केल्यानंतर त्यांची या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यांच्या खोलीत ढेकूण आणि माशा फार जास्त असल्याची माहिती अलिकडेच समोर आली होती.
मंगळवारी खान यांच्या वकिलाने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होणे बाकी आहे. त्यातच इम्रान खान यांनी आपल्या वकिलांना, काहीही करा पण मला येथून बाहेर काढा, असे सांगितले आहे. मला येथे एक क्षणही राहायचे नाही, बाहेर काढा, येथे माझ्या जीवालाही धोका आहे, असे इम्रान खान यांनी वकिलांना सांगितले असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. खान यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे मत आहे.दरम्यान, दिलासा मिळेपर्यंत आपल्याला अन्य कारागृहात ठेवण्यात यावे, अशी विनंती खान यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात केली असून, त्यावर न्यायालयाने सरकारला नोटीस जारी करून उत्तर मागितले आहे. यावर ११ तारखेला सुनावणी करण्यात येणार आहे.

Posted by : | on : 9 Aug 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g