|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.74° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.18 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.32°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

27.94°C - 31.58°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.2°C - 30.44°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.21°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.63°C - 29.87°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.53°C - 29.77°C

sky is clear
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय » मी सत्तेत आल्यास एकाच दिवसात युद्ध संपवेल

मी सत्तेत आल्यास एकाच दिवसात युद्ध संपवेल

– डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा,
वॉशिंग्टन, (६ मार्च) – मी पुन्हा सत्तेत आल्यास रशिया-युक्रेन युद्ध एकाच दिवसांत संपवेन. हे युद्ध संपवून तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखू शकतो, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष निवडणुकीत भाग घेण्याची तयारी करीत आहे. ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर केली असून, प्रचारालाही सुरुवात केली आहे. सध्या ट्रम्प जागोजागी जाऊन पक्षाचा अजेंडा सांगत आहेत. अशाच एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर वक्तव्य केले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. ते म्हणाले की, मी एका दिवसात रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवू शकतो. माझे सरकार आल्यास तिसरे महायुद्धही होणार नाही. रशिया आणि युक्रेनच्या मुद्यावर ट्रम्प यापूर्वीही अनेकदा बोलले आहेत. आमच्या काळात शांतता राखण्याचे अनेक प्रयत्न यशस्वी झाल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्यावरही सध्या संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. अमेरिका संसद दंगल प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अनेक प्रबळ पुरावे हाती लागले आहेत. पोलिस त्यांच्याविरोधात कधीही गुन्हा दाखल करू शकतात. गुरुवारी अमेरिकन जस्टिस डिपार्टमेंटने ६ जानेवारी २०२१ रोजी यूएस कॅपिटोल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात ट्रम्प यांचा दावा नाकारण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी याप्रकरणातून आपली सुटका करण्याची मागणी केली आहे.

Posted by : | on : 6 Mar 2023
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g