किमान तापमान : 28.85° C
कमाल तापमान : 30.28° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.68 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.28° C
28.94°C - 32.15°C
sky is clear28.65°C - 31.48°C
sky is clear28.57°C - 30.39°C
sky is clear28.58°C - 30.33°C
broken clouds28.41°C - 30.14°C
broken clouds28.64°C - 30.26°C
light rainकोरोना महामारीचे सावट,
वॉशिंग्टन, २ नोव्हेंबर – कोरोना महामारीच्या सावटात जगातील जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत उद्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे आव्हान आहे. बिडेन हे बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्राध्यक्ष होते. निवडणूक प्रचारात कोरोनाचा संसर्ग, वर्णद्वेष, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आदी मुद्दे ठळकपणे समोर आले होते.
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येते. अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदारांना या कालावधीत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करता येणार आहे.
अमेरिकेत मतदानानंतर तातडीने निवडणुकीचे कल येण्यास सुरुवात होते. यामध्ये बर्यापैकी कल स्पष्ट झालेला असतो. मात्र, यंदाचे चित्र वेगळे असून, नऊ कोटी पोस्टल मते आहेत. त्यामुळे कल समोर येण्यास अधिक वेळ लागू शकतो. मतदान संपल्यानंतर काही राज्यांमध्ये निवडणूक निकाल जाहीर होऊ शकतात.