|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.95° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 5.1 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 32.99°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.64°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.48°C - 29.63°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.57°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.89°C - 30.3°C

scattered clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » रासायनिक शस्त्रे वापरण्याचा डाव हमासने रचला होता

रासायनिक शस्त्रे वापरण्याचा डाव हमासने रचला होता

जेरुसलेम, (२३ ऑक्टोबर) – इस्रायलवर केलेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यांदरम्यान रासायनिक शस्त्रे वापरण्याचा डाव हमासने रचला होता, अशी माहिती इस्रायलच्या दोन अधिकार्यांनी दिली. ठार झालेल्या हमासच्या दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून एक यूएसबी ड्राईव्ह इस्रायल डिफेन्स फोर्स अर्थात् आयडीएफच्या सैनिकांना सापडले. यात सायनाईड पसरवण्याचे साधन तयार करण्याबाबत सूचना होत्या तसेच त्यांच्याकडे त्याचे साहित्यही आढळले, असे या अधिकार्यांनी सांगितले.
हमासच्या दहशतवाद्यांकडे रासायनिक शस्त्र बनवण्याचे जे साहित्य सापडले, त्याचा संबंध अल् कायदाशी आहे. इस्रायलच्या दोन अधिकार्यांनी सायनाईड पसरवण्याच्या साधनाबाबत तपशीलवार माहिती दिली आणि याबाबतची इस्रायलयच्या परराष्ट्र विभागाकडे असलेली गोपनीय माहिती माध्यमांना देण्यात आली. इस्रायलच्या नागरिकांविरुद्ध केलेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचा इरादा हमासचा होता, हे पुराव्यांतून स्पष्ट झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हल्ल्यादरम्यान रासायनिक शस्त्रे वापरण्याच्या कटाची माहिती हमासने जाणीवपूर्वक फोडलेली नाही किंवा ते अशा प्रकारचे शस्त्र तयार करीत असल्याची योजनाही फुटलेली नाही. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाच्या सामूहिक विध्वंस घडवणार्या शस्त्रास्त्रे प्रसारबंदी विभागाने इस्रायली दूतावासांना ‘हमासचा हेतू रासायनिक शस्त्रास्त्रे वापरण्याचा होता’ या शीर्षकाखाली एक वर्गीकृत केबल प्रसारित केली.
वॉशिंग्टन पोस्टने अलिकडेच हमासने दहशतवाद्यांना दिलेल्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचना दहशतवाद्याच्या मृतदेहाजवळ आढळल्या. यात त्यांनी किती भयंकर तयारी केली, ते स्पष्ट झाले. यात चाकूने हत्या कशी करावी आणि इस्रायलच्या सुरक्षा उपकरणांमधील त्रुटी काय आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. हे दस्तावेज हमासच्या इझ्झेदिन अल् कासम ब्रिगेडसाठी तयार करण्यात आले. त्यात अभियंते, चिलखती वाहनविरोधी, पायदळ, स्नायपर आणि सुरुंग तज्ज्ञांचा समावेश आहे आणि या पुस्तिकेत ‘शॉक ट्रॉप्स’ असे वर्णन करण्यात आले. हा एक लष्करी दस्तावेज आहे.
हमासचा क्रूर चेहरा जगासमोर आणणार
७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासने केेलेल्या नरसंहाराचे न पाहिलेले फुटेज प्रसिद्ध करणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले आहे. हमासने केलेल्या हल्ल्याचे फुटेज सोमवारी प्रदर्शित केले जाईल. हा व्हिडीओ अद्याप लोकांनी पाहिलेला नाही. महिला आणि मुलांसह इस्रायली नागरिकांची क्रूक कत्तल आणि शेकडो ओलीस ठेवल्याचेही या व्हिडीओत आहे, अशी माहिती इस्रायल सरकारचे प्रवक्ते आयलॉन लेव्ही यांनी दिली.

Posted by : | on : 23 Oct 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g