किमान तापमान : 31.01° C
कमाल तापमान : 32.33° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 74 %
वायू वेग : 4.52 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.33° C
29.12°C - 32.99°C
sky is clear29.33°C - 31.9°C
few clouds28.86°C - 31.58°C
sky is clear28.78°C - 30.34°C
broken clouds28.76°C - 30.2°C
scattered clouds28.59°C - 30.45°C
overcast cloudsन्यूयॉर्क, (१७ मार्च) – च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचे नाव पुढे येऊ लागले परंतु भारतात ३० जानेवारी २०२० रोजी पहिले प्रकरण समोर आले. त्यानंतर ती वणव्यासारखी पसरली. तेव्हापासून हा विषाणू कुठून आला यावर वाद सुरू आहे. त्याचा उगम कसा झाला? तज्ञांनी यासाठी चीनच्या वुहान लॅबला जबाबदार धरले परंतु चीनने त्याचा साफ नकार दिला केला. मात्र आता तीन वर्षांनंतर यामध्ये काही प्रमाणात यश आले आहे. हा विषाणू वटवाघुळ, उंदीर नसून रॅकून कुत्र्यांकडून पसरतो. कोविड साथीच्या आजाराच्या उत्पत्तीने संशोधकांना बराच काळ गोंधळात टाकले आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की तज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाला पुरावे सापडले की कोरोनाव्हायरस संसर्ग रॅकून कुत्र्यांकडून पसरू शकतो. चीनमधील वुहान येथील सीफूड मार्केटमध्ये हे कुत्रे बेकायदेशीरपणे विकले जात होते.
अहवालात असे म्हटले आहे की, संशोधकांनी २०२० मध्ये हुनान सीफूड होलसेल मार्केट आणि जवळपासच्या भागातून अनुवांशिक डेटा फॉर्म स्वॅब गोळा केला. त्यानंतर लॅबमध्ये त्यांच्या स्वॅबची चाचणी करण्यात आली. बहुतेक स्वॅब संक्रमित होते. अहवालात असे म्हटले आहे की, जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणार्या गाड्या आणि पिंजर्यांमधून स्वॅब घेण्यात आले. विश्लेषणात असे आढळून आले की नमुने एका विषाणूने संक्रमित होते ज्यात रॅकून कुत्र्यांसह इतर प्राण्यांचे अनुवांशिक साहित्य होते. जरी हे पुष्टी करत नाही की रॅकून कुत्र्यांना संसर्ग झाला आहे किंवा त्यांनी हा विषाणू मानवांमध्ये प्रसारित केला आहे. हा विषाणू वन्य प्राण्यांकडून पसरत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.