किमान तापमान : 28.59° C
कमाल तापमान : 28.86° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 1.74 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.86° C
27.84°C - 30°C
few clouds27.41°C - 29.88°C
sky is clear27.82°C - 30.19°C
sky is clear28.29°C - 30.24°C
sky is clear27.9°C - 30.83°C
light rain28.33°C - 30.41°C
light rainनवी दिल्ली, (२२ फेब्रुवारी ) – लंडनमधील अमेरिकन दूतावासात सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर तेथील सर्व कर्मचार्यांना बाहेर काढून ’खिडक्यांपासून दूर’ राहण्यास सांगितले जात आहे. लंडनमधील अमेरिकन दूतावासात एक ’संशयास्पद पॅकेज’ सापडले आहे. त्यामुळे या जागेला कुलूप लावले जाणार आहे. दूतावासाबाहेर सशस्त्र पोलीस आहेत.
दूतावासात संशयास्पद पॅकेट मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दूतावासातील लोकांनी फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की तेथे काम करणारे लोक जमिनीवर वाकून आणि भिंतीच्या मागे बसलेले दिसतात. यासोबतच पोलिसांचा फौजफाटाही घटनास्थळी उपस्थित आहे. एका स्थानिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सांगितले की परिसरात अनेक सशस्त्र पोलिस उपस्थित होते आणि लोक ओरडत होते. मात्र, सुरक्षेला धोका कशामुळे निर्माण झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये दूतावासाच्या परिसरात किमान दोन अग्निशमन गाड्या आणि पोलिस वाहने दिसत आहेत.