|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.58° C

कमाल तापमान : 28.85° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 3.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.85° C

Weather Forecast for
Saturday, 11 May

28.82°C - 31°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.59°C - 30.51°C

moderate rain
Weather Forecast for
Monday, 13 May

27.83°C - 30.56°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.58°C - 30.98°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.85°C - 30.65°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 16 May

28.65°C - 31.32°C

light rain
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » लष्करप्रमुख नरवणे यांचा नेपाळ लष्कराकडून विशेष सन्मान

लष्करप्रमुख नरवणे यांचा नेपाळ लष्कराकडून विशेष सन्मान

भारत-नेपाळ लष्करी सहकार्य वाढविणार,
काठमांडू, ५ नोव्हेंबर – भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते गुरुवारी एका खास समारंभात नेपाळचे मानद लष्करप्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले. काठमांडू येथील ‘शीतलनिवास’ या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात जनरल नरवणे यांना तलवार आणि पुस्तक भेट देण्यात आले. पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली, भारतीय राजदूत विनय एम क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित होते. १९५० मध्ये सुरू झालेली ही परंपरा दोन सैन्यदलांमधील मजबूत संबंध प्रतिबिंबित करते.
१९५० मध्ये नेपाळ लष्कराकडून सन्मानित झालेले जनरल केएम करिअप्पा हे पहिले भारतीय लष्करप्रमुख होते. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत नेपाळचे लष्करप्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा यांनाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय लष्कराचे मानद प्रमुख म्हणून सन्मानित केले होते.
या समारंभानंतर जनरल नरवणे यांनी नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचे सन्मानाबद्दल आभार मानले. तसेच द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठीच्या उपायांवरही त्यांनी चर्चा केली, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली.
जनरल नरवणे यांची नेपाळ लष्करप्रमुखांसोबत चर्चा
लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज गुरुवारी नेपाळमधील त्यांचे समकक्ष जनरल पूर्णचंद्र थापा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही लष्करप्रमुखांमध्ये दोन्ही देशांतील मैत्रीसंबंध अधिक दृढ करणे आणि दोन्ही देशांत लष्करी सहकार्य देण्याबाबत चर्चा केली. थापा यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून लष्करप्रमुख तीन दिवसांच्या नेपाळ दौर्‍यावर गेले आहेत.
सीमावाद उफाळल्यानंतर दोन्ही देशांमध्ये बिघडलेले संबंध पूर्ववत करण्याच्या उद्देशाने ते नेपाळ दौर्‍यावर गेले आहेत. नेपाळचे लष्करप्रमुख थापा यांची त्यांनी कार्यालयात भेट घेतली. द्विपक्षीय हिताच्या मुद्यांवर दोन्ही लष्करप्रमुखांनी परस्परांची मते जाणून घेतली आणि दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य दृढ करण्यासोबतच मैत्रीसंबंध अधिक बळकट करण्याबाबत त्यांनी चर्चा केली, असे नेपाळच्या लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्या चर्चेवेळी त्यांना नेपाळी लष्कराचा इतिहास आणि सद्यःस्थितीतील भूमिकेबाबत माहिती देण्यात आली. काठमांडू येथे बुधवारी दाखल झालेल्या नरवणे नेपाळी लष्कराच्या मुख्यालयात आयोजित विविध कार्यक्रमांत सहभागी झाले. शहीद झालेल्या नेपाळच्या सैनिकांना आदरांजली अर्पण केल्यानंतर त्यांना आज सकाळी नेपाळी लष्कराने मानवंदना दिली. नेपाळमध्ये तयार करण्यात आलेली एक लाख मुखाच्छादने आणि शांततेचे प्रतीक म्हणून बुद्धप्रतिमा यावेळी थापा यांनी नरवणेंना भेट दिली.

Posted by : | on : 5 Nov 2020
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g