किमान तापमान : 28.79° C
कमाल तापमान : 30.26° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 76 %
वायू वेग : 3.96 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.26° C
27.7°C - 30.99°C
sky is clear28.13°C - 30.93°C
sky is clear28.35°C - 29.77°C
sky is clear28.06°C - 29.68°C
sky is clear27.83°C - 29.23°C
sky is clear27.7°C - 29.15°C
sky is clear-महिलांच्या एकूण स्थितीवर चिंता व्यक्त,
संयुक्त राष्ट्र, (८ मार्च) – जगातील लैंगिक समानता जोपासण्यात आपण शून्य असून, सध्याची स्थिती पाहता ही समानता प्राप्त करण्यास आणखी ३०० वर्षांचा काळ लागू शकेल, अशी चिंता संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अॅन्टोनियो गुटारेस यांनी व्यक्त केली. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त महिलांच्या एकूण स्थितीवर त्यांनी मत व्यक्त केले.
अॅन्टोनियो गुटारेस यांनी जगभरातील मातृ मृत्यूदराच्या उच्च प्रमाणावर भाष्य केले. अनेक देशांमध्ये मुलींचा कमी वयात विवाह करून देण्यात येतो. धक्कादायक म्हणजे काही परंपरांचे पालन करत त्यांना तसे करण्यास बाध्य करण्यात येते. मुलींचे अपहरण, त्यांना शाळांमध्ये जाण्यापासून रोखणे, असे प्रकार वारंवार दिसून येतात. यातून हीच बाब सिद्ध होते की, लैंगिक समानता प्राप्त करण्याची आशा दूर दूर जात असल्याचे अॅन्टोनियो गुटारेस म्हणाले.
युनो सरचिटणीसांनी विशेषत्वाने अफगाणिस्तानचा उल्लेख करत म्हटले की, जगात महिलांचे हक्क, अधिकार नाकारण्यात येत आहे. बालिका, तरुणी यासार‘या प्रत्येक टप्प्यात त्यांना सार्वजनिक जीवनातून नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु, आम्ही महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी लढा देत राहू, असा निर्धार अॅन्टोनियो गुटारेस यांनी व्यक्त केला.
ही बाब कठीणच : सीमा बहाऊस
यूएन वूमेनच्या कार्यकारी संचालक सीमा बहाऊस यांनी म्हटले की, सध्याचा काळ हा महिलांचे अधिकार आणि लैंगिक समानतेसाठी महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी एकजूट होत महिलावर्गाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढे यावेत. त्यांचे उत्पन्न, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य यात प्रगतीच्या दृष्टीने गुंतवणूक गरजेची आहे. यात जितका उशीर होईल, तितकी ही बाब कठीण होत जाईल आणि त्यासाठी मोठी किमत चुकवावी लागेल.