किमान तापमान : 29.4° C
कमाल तापमान : 29.79° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.37 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.79° C
27.43°C - 30.24°C
few clouds27.7°C - 30.01°C
sky is clear27.58°C - 29.99°C
sky is clear27.91°C - 30.39°C
sky is clear28.02°C - 30.38°C
scattered clouds28.04°C - 30.47°C
sky is clearव्हॅटिकन सिटी, (११ फेब्रुवारी ) – पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकन सिटीमध्ये विरोध होत आहे. पोप फ्रान्सिस यांचे परराष्ट्र संबंध आणि ते करत असलेल्या बदलांवर त्यांचे विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. यापूर्वी, पोप बेनेडिक्ट यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी निधन झाले. माजी पोप बेनेडिक्ट यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे जवळचे सहकारी जॉर्ज गॅन्सवेन यांनी उघड केले की पोप फ्रान्सिस धार्मिक पद्धतींमध्ये करत असलेल्या काही बदलांबद्दल बेनेडिक्ट चिंतेत होते.
याआधीही पोप फ्रान्सिस यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. कॅथोलिक चर्चची प्रशासकीय शाखा असलेल्या रोमन क्युरियानेही पोप फ्रान्सिस यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांना हुकूमशाही म्हटले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन कार्डिनल जॉर्ज पेल यांनीही एक चिठ्ठी लिहून पोप फ्रान्सिस यांच्यावर टीका केली होती. जॉर्ज पेल यांच्यावर लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आता जर्मन कार्डिनल जेरार्ड मुलर यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाबाबत गदारोळ उठला आहे. २०२१ साली पोप फ्रान्सिस यांनी सुरू केलेल्या कॅथोलिक चर्चच्या भवितव्याबद्दल जागतिक मंथन सुरू आहे. या विचारमंथनात चर्चमध्ये महिलांना जागा देणे, बाललैंगिक अत्याचाराची प्रकरणे हाताळणे आणि धर्मगुरूंचे लग्न, एलजीबीटी समुदायाचे चर्चमध्ये स्वागत करणे आदी बाबींवर चर्चा केली जात आहे.