|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.29° C

कमाल तापमान : 27.9° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 72 %

वायू वेग : 1.1 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.29° C

Weather Forecast for
Friday, 03 May

26.99°C - 30.06°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

28.07°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.15°C - 30.43°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.47°C - 30.3°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.59°C - 30°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.19°C - 29.56°C

sky is clear
Home » आंतरराष्ट्रीय, युरोप » शी जिनपिंग ‘हुकूमशहा’: जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेयरबॉक

शी जिनपिंग ‘हुकूमशहा’: जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेयरबॉक

-ड्रॅगनचा प्रचंड थयथयाट, नोंदविला निषेध,
-जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांचे रोखठोक वक्तव्य,
बर्लिन, (२०सप्टेंबर) – जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना ‘हुकूमशहा’ म्हटल्याने ड्रॅगनने प्रचंड थयथयाट केला आहे. जर्मन मंत्र्यांनी जिनपिंग यांना ‘हुकूमशहा’ संबोधल्याबद्दल चीन सरकार इतके संतप्त झाले आहे की त्यांनी अधिकृतपणे जर्मनीकडे निषेध नोंदवला आहे. ‘जर ब्लादिमिर पुतिन यांना युद्धात विजय मिळाला तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासारख्या जगातील अनेक हुकूमशहांना काय संकेत जाईल’ असे जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेयरबॉक यांनी दोन दिवसांपूर्वी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते. युक्रेनने ही लढाई जिंकलीच पाहिजे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
परराष्ट्र मंत्री बेयरबॉक यांचे हे रोखठोक विधान ड्रॅगनच्या जिव्हारी लागले आहे. यामुळे चीन सरकारला मोठाच धक्का बसला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी बेयरबॉक यांच्या विधानावर तिव्र आक्षेप नोंदवला आणि असे वक्तव्य उघडउघड राजकीय चिथावणीखोर असल्याचे म्हटले आहे. ‘हे अतिशय बेजबाबदार विधान असून आम्ही जर्मनीच्या या विधानाचा तिव्र निषेध करतो, हे विधान आम्ही फेटाळून लावत आहोत. याला काहीही अर्थ नाही’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग पत्रकारांशी बोलताना म्हणाले. निंग यांच्या या तिखट प्रतिक्रियेवरून ड्रॅगनचा किती जळफळाट झाला आहे, हे स्पष्ट होते.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे सरचिटणीस आणि लष्करप्रमुखही आहेत. आज ते माओ त्से तुंग यांच्यानंतरचे सर्वांत शक्तिशाली नेते मानले जातात. चीन, युरोपियन युनियन तसेच जर्मनी यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या पृष्ठभूमीवर बेयरबॉक यांनी हे वक्तव्य केले आहे. अशाप्रकारची टिप्पणी तथ्यांच्या विरुद्ध आणि राजकीय शिष्टाचाराचे उल्लंघन आहे. चीनने या प्रकरणी जर्मनीकडे अधिकृतपणे राजनैतिक निषेध नोंदवला आहे, असे प्रवक्ते माओ निंग म्हणाले. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हटले होते.

Posted by : | on : 21 Sep 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, युरोप
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g