|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.19° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.87°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.59°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.5°C - 29.74°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.47°C - 30.36°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.7°C - 29.77°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.12°C - 30.09°C

overcast clouds
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील

– गृहमंत्री सनाउल्लाह यांची माहिती,
इस्लामाबाद, (१७ एप्रिल) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू होताच लंडनहून देशात परत येतील, अशी माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रयत्नांनंतरही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका होणार नाहीत, असे सनाउल्लाह यांनी स्पष्ट केले. सध्या लंडनमध्ये असलेले नवाझ शरीफ परत येतील आणि पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने उपचारासाठी चार आठवड्यांची सूट दिल्यापासून, आजारी ७३ वर्षीय नवाझ शरीफ नोव्हेंबर २०१९ पासून वैद्यकीय उपचारांसाठी लंडनमध्येच आहेत. तेथे जाण्यापूर्वी ते अल् अजिझिया भ‘ष्टाचार प्रकरणात लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात सात वर्षांची शिक्षा भोगत होते.
इम्रान खान पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात मुदतपूर्व निवडणुकांसाठी जोर लावत असल्याने प्रांतीय निवडणुका घेण्याचा मुद्दा पाकिस्तानच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. ५ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील निवडणुका ८ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याचा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाचा निर्णय असंवैधानिक ठरवला होता आणि १४ मे ही तारीख निश्चित केली.

Posted by : | on : 17 Apr 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g